३१ शिक्षण सेवक पुन्हा मैदानात
By Admin | Updated: June 19, 2014 23:56 IST2014-06-19T23:56:26+5:302014-06-19T23:56:26+5:30
नागपूर उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा चुकिचा अर्थ लाऊन सेवेतून कार्यमुक्त करण्यात आलेले ३१ शिक्षण सेवक आपल्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी पुन्हा मैदानात उतरले आहेत. १८ जून पासून या शिक्षण

३१ शिक्षण सेवक पुन्हा मैदानात
साखळी उपोषण सुरू : पुनर्नियुक्तीची मागणी
गोंदिया : नागपूर उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा चुकिचा अर्थ लाऊन सेवेतून कार्यमुक्त करण्यात आलेले ३१ शिक्षण सेवक आपल्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी पुन्हा मैदानात उतरले आहेत. १८ जून पासून या शिक्षण सेवकांनी पुन्हा साखळी उपोषण सुरू केले आहे.
१४ फेब्रुवारी रोजीचे कार्यमुक्तीचे आदेश परत घेण्यात यावे, १६ आॅगस्ट रोजीचे शिक्षण सेवकांचे आदेश कायम ठेवण्यात यावे व ७ जानेवारी २०१३ पासूनचे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण सेवक पदाचे मानधन देण्यात यावे या मागणीला घेऊन या ३१ शिक्षण सेवकांनी ३ मार्च पासून जिल्हा परिषद कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले होते.
२७ मार्च पर्यंत चाललेल्या त्यांच्या या उपोषणाची पूर्तता तर झाली नाही मात्र मधातच लोकसभा निवडणुकीची आचार संहिता लागू झाल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून व कायद्याचा मान राखत त्यांनी हे आंदोलन स्थगित केले होते.
मात्र प्रशासनाकडून दरम्यानच्या कालावधीत ही त्यांच्या मागण्यांवर लक्ष देण्यात आले नाही. त्यामुळे या ३१ शिक्षण सेवकांनी १८ जून पासून पुन्हा जिल्हा परिषद कार्यालयासमोर आपल्या आंदोलनाचे मंडप गाडले आहे.
मागण्यांची त्वरीत पूर्तता न झाल्यास हे आंदोलन सुरूच राहणार असा इशारा जे.के.कटरे, कु.एम.के.पटले, आर.आर.कटरे, एफ.Þडी.नागफासे, श्री पारधी, कु. पारधी सह अन्य शिक्षण सेवकांनी दिला आहे. (शहर प्रतिनिधी)