ग्रामसडक योजनेतून जिल्ह्याला ३०.९२ कोटी

By Admin | Updated: March 17, 2016 02:25 IST2016-03-17T02:25:42+5:302016-03-17T02:25:42+5:30

जिल्ह्यातील ६८.२५ किलोमीटर रस्त्यांचा दर्जा सुधारण्यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून जिल्ह्याला ३० कोटी ९२ लाख रुपयांचा निधी देण्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आली.

30.92 crore in the district from Gram Sadak Yojana | ग्रामसडक योजनेतून जिल्ह्याला ३०.९२ कोटी

ग्रामसडक योजनेतून जिल्ह्याला ३०.९२ कोटी

पालकमंत्र्यांचा पुढाकार : रस्त्यांचा दर्जा सुधारणार
गोंदिया : जिल्ह्यातील ६८.२५ किलोमीटर रस्त्यांचा दर्जा सुधारण्यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून जिल्ह्याला ३० कोटी ९२ लाख रुपयांचा निधी देण्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आली. जिल्ह्यातील आठही तालुक्यात यातून रस्त्यांची कामे होणार आहेत.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्यमंत्री तथा पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या पुढाकाराने तसेच आमदार विजय रहांगडाले व आमदार संजय पुराम यांच्या मागणीनुसार हा निधी मंजूर करण्यात आला. प्रशासकीय मान्यता मिळालेल्या कामांमध्ये गोंदिया तालुक्यातील कुडवा ते रावणवाडी या ४.४३ किलोमीटर रस्त्यांच्या बांधकामासाठी २१०.२१ लाख रुपयांच्या निधीला मान्यता मिळाली आहे. काम पूर्णत्वास गेल्यानंतर त्याच्या देखभाल व दुरूस्तीसाठी पाच वर्षाकरीता अंदाजीत १४.७१ लाख रुपयाची तरतुद केली आहे.
गुदमा ते छोटा गोंदिया या ५.९४ किलोमीटर रस्त्यासाठी २९६.७५ लाख आणि देखभाल दुरूस्तीसाठी २०.७७ लाख रुपये, आमगाव तालुक्यातील आमगाव ते सोनेखारी या ४.६८ किलोमीटर रस्त्यासाठी २१०.७६ लाख व देखभाल दुरूस्तीसाठी १४.७५ लाख रुपये, अर्जुनी मोरगाव तालुक्यातील मांडोखाल ते सिरोली या ९.६५ किलोमीटर रस्त्यासाठी ४४८.८५ लाख व देखभाल दुरूस्तीसाठी ३१.४२ लाख रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.
देवरी तालुक्यातील राज्य महामार्ग क्रमांक ३६३ देवरी ते मंगेझरी या ११.२४ किलोमीटर रस्त्यासाठी ४८०.१० लाख व देखभाल दुरूस्तीसाठी ३३.४३ लाख रुपये, गोरेगाव तालुक्यातील मोहगाव ते बोटे या ७.२६ किलोमीटर रस्त्यासाठी २२७.३३ लाख व देखभाल दुरूस्तीसाठी १५.९१ लाख रुपये, सडक अर्जुनी तालुक्यातील डव्वा ते मुंडीपार/ईश्वर या ६६० किलोमीटर रस्त्यासाठी ३२९.४९ लाख व देखभाल दुरूस्तीसाठी २३.०६ लाख रुपये, पांढरी ते गिरोला या २.१५ किलोमीटर रस्त्यासाठी १०४.६३ लाख व देखभाल दुरूस्तीसाठी ७.३२ लाख रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.
सालेकसा तालुक्यातील कावराबांध ते कुंभारटोला या ५.१० किलोमीटर रस्त्यासाठी २२२.५६ लाख व देखभाल दुरूस्तीसाठी १५.५८ लाख रुपये, रामा ३३५ ते बोईटोला या ४.२० किलोमीटर रस्त्यासाठी १९५.११ लाख व देखभाल दुरूस्तीसाठी १३.६६ लाख रुपये आणि तिरोडा तालुक्यातील तिरोडा ते करटी बुज. या ७ किलोमीटर रस्त्याच्या बांधकामासाठी ३६६.२७ लाख आणि पाच वर्षाच्या देखभाल दुरूस्तीसाठी २५.६४ लाख रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: 30.92 crore in the district from Gram Sadak Yojana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.