विशेष सहाय्य योजनेची ३०६ प्रकरणे निकाली

By Admin | Updated: September 25, 2015 02:16 IST2015-09-25T02:16:59+5:302015-09-25T02:16:59+5:30

अर्जुनी मोरगाव तालुकास्तरावरील गठीत झालेल्या निराधार योजना समितीच्या पहिल्या बैठकीत ३०६ प्रकरणे निकाली काढण्यात आली.

306 cases of Special Assistance Scheme were taken out | विशेष सहाय्य योजनेची ३०६ प्रकरणे निकाली

विशेष सहाय्य योजनेची ३०६ प्रकरणे निकाली

खरा लाभार्थी वंचित राहणार नाही : समिती अध्यक्ष लांजेवार यांची ग्वाही
बोंडगावदेवी : अर्जुनी मोरगाव तालुकास्तरावरील गठीत झालेल्या निराधार योजना समितीच्या पहिल्या बैठकीत ३०६ प्रकरणे निकाली काढण्यात आली. तहसील कार्यालयात प्राप्त झालेल्या अर्जाची पाहणी करुन विशेष सहाय्य योजनेचे ३०६ अर्ज समितीने मंजूर केले. त्या लाभार्थ्यांना आॅगस्ट महिन्यापासूनचे अर्थसहाय्य करण्यात येणार आहे.
तालुका संजय गांधी निराधार योजना समितीची पहिलीच बैठक तहसील कार्यालयात मंगळवारी घेण्यात आली. अध्यक्षस्थानी समितीचे अध्यक्ष रघुनाथ लांजेवार होते. या बैठकीला तहसीलदार कल्याणकुमार डहाट, नायब तहसीलदार गावळ, समितीचे सदस्य शशीकला भाग्यवंत, लायकराम भेंडारकर, आसाराम मेश्राम, आनंदराव तिडके, खंडविकास अधिकारी नारायण जमईवार प्रामुख्याने उपस्थित होते.
समितीचे नवनियुक्त अध्यक्ष लांजेवार यांनी गरजू लाभार्थी शासनाच्या विशेष सहाय्य योजनेच्या अनुदानापासून वंचित राहणार नाही याची खबरदारी घ्यावी, आलेल्या सर्व अर्जाची पाहणी करुन समितीपुढे अर्ज सादर करुन प्रकरण निकाली काढण्याला प्राधान्य देण्याच्या सूचना केल्या.
या बैठकीत इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती योजनेचे १३२ अर्ज, इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्ती योजनेचे २ अर्ज, संजय गांधी निराधार अनुदार योजना ८० अर्ज, श्रावणबाळ सेवानिवृत्ती नॉन बीपीएल योजना ९२ अर्ज, असे एकूण ३०६ अर्ज मंजूर करण्यात आले.
या निवड झालेल्या लाभार्थ्यांना आॅगस्ट महिन्यापासून अर्थसहाय्य दिले जाणार आहे. ज्या अर्जदारांच्या अर्जामध्ये काही तृट्या आहेत अशांना त्या अर्जांची पूर्तता करण्यास सांगितले. (वार्ताहर)

Web Title: 306 cases of Special Assistance Scheme were taken out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.