३०० रूपयांची लाच लिपिकाला भोवली

By Admin | Updated: June 28, 2015 01:06 IST2015-06-28T01:06:52+5:302015-06-28T01:06:52+5:30

शाळेतील परिचराकडून ३०० रूपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शाळेतील कनिष्ठ सहायकास रंगेहात पकडले.

300 rupees bribe lipika Bhavali | ३०० रूपयांची लाच लिपिकाला भोवली

३०० रूपयांची लाच लिपिकाला भोवली

एसीबीकडून अटक : बोंडगावदेवी येथील कार्यवाही
बोंडगावदेवी : शाळेतील परिचराकडून ३०० रूपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शाळेतील कनिष्ठ सहायकास रंगेहात पकडले. शुक्रवारी (दुपारी १२ वाजतादरम्यान अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील बोंडगावदेवी येथील जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये ही कारवाई केली.
सविस्तर असे की, तक्रारदार बोंडगावदेवी येथील जिल्हा परिषद शाळेत परिचर पदावर कार्यरत आहे. त्याच शाळेत कार्यरत कनिष्ठ सहायक आरोपी हितेंद्र तुळशीदास सतदेवे याने तक्रारदारास पगार काढून दिल्याचा मोबदला तसेच तक्रारदाराची पंचायत समिती अर्जुनी-मोरगाव येथे बदली झाल्याने कार्यमुक्तीचा आदेश देण्याकरिता ३०० रूपयांची लाच मागीतली. यावर मात्र तक्रारदाराने गुरूवारी (दि.२५) लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात तक्रार दिली.
तक्रारीच्या आधारे पथकाने शुक्रवारी (दि.२६) दुपारी १२ वाजता दरम्यान शाळेत सापळा लावला. येथे आरोपी सतदेवे याने पंचांसमक्ष तक्रारदारास काम करून देण्यासाठी ३०० रूपयांची मागणी करून रक्कम स्वीकारली. यावर पथकाने आरोपीस ३०० रूपयांची लाच घेताना रंगेहात पकडले.
ही कार्यवाही पोलीस उपअधिक्षक दिनकर ठोसरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक प्रमोद धोंगे, सहायक फौजदार दिवाकर भदाडे, हवालदार गोपाल गिरीपुंजे, शिपाई रंजीत बिसेन, दिगंबर जाधव, योगेश उईके, शेखर खोब्रागडे, वंदना बिसेन, चालक गायधने यांनी यशश्वी केली. (वार्ताहर)

Web Title: 300 rupees bribe lipika Bhavali