शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

भरडाईसाठी ३ लाख क्ंिवटल धानाची उचल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2019 22:04 IST

यंदा मार्केटींग फेडरेशनने आतापर्यंत १० लाख ५७ हजार २९६ क्विंटल धान खरेदी केली आहे. त्यातील ३ लाख १ हजार ६६२ क्विंटल धानाची भरडाईसाठी उचल करण्यात आली असून त्यातील २६ हजार ५११ क्विंटल धान राईस मिलर्सकडून मिळावयाचा आहे.

ठळक मुद्देमार्केटिंग फेडरेशनचे धान : २६ हजार क्ंिवटल धान राईस मिलर्सकडे

कपिल केकत।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : यंदा मार्केटींग फेडरेशनने आतापर्यंत १० लाख ५७ हजार २९६ क्विंटल धान खरेदी केली आहे. त्यातील ३ लाख १ हजार ६६२ क्विंटल धानाची भरडाईसाठी उचल करण्यात आली असून त्यातील २६ हजार ५११ क्विंटल धान राईस मिलर्सकडून मिळावयाचा आहे.मागील काही वर्षांत पावसाने दगा दिल्याने धानाच्या जिल्ह्यातच धानाचे उत्पादन घटत असल्याचे दिसत आहे. परिणामी धान उत्पादक संकटात अडकले होते. मात्र यंदा पावसाने साथ दिल्याने धानाचे चांगले उत्पादन झाले. हेच कारण आहे की, मार्केटींग फेडरेशनने आतापर्यंत १० लाख ५७ हजार २९६ क्विंटल धान खरेदी केली आहे.खरेदी करण्यात आलेले धान पुढे भरडाईसाठी देऊन राईस मिलर्सकडून तांदूळ घेतले जाते. त्यानुसार, मार्केटींग फेडरेशनकडून ३ लाख १ हजार ६६२ क्विंटल धान भरडाईसाठी राईसमिलर्स कडून उचलण्यात आला आहे.उचल करण्यात आलेल्या या संपूर्ण ३ लाख १ हजार ६६२ क्विंटल धानाची भरडाई करण्यात आली असून त्यातील २ लाख २ हजार ११३ तांदूळ प्राप्त झालेला आहे. त्यातील १ लाख ७५ हजार ६०२ क्ंिवटल धान पुरवठा विभागाच्या ताब्यात देण्यात आला असून २६ हजार ५११ क्विंटल धान राईस मिलर्सकडून प्राप्त व्हावयाचा आहे.विशेष म्हणजे, ही सध्याची परिस्थिती असून मार्चपर्यंत धान खरेदी केली जाणार असल्याने धान खरेदीची आकडेवारी आणखी वाढण्याची दाट शक्यता आहे.१५३ राईस मिल्सचा करारमार्केटिंग फेडरेशनने खरेदी केलेल्या धानाची भरडाई करण्यासाठी धान राईस मिलर्सला दिला जातो. यंदा १० लाख ५७ हजार २९६ क्विंटल धान मार्केटींग फेडरेशनने खरेदी केले आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणाता धानाची खरेदी व आता त्याची भरडाई करणे सोपे काम नाही. त्यामुळे धानाची भरडाई करण्यासाठी यंदा १५३ राईस मिल्ससोबत करार करण्यात आला आहे. करार झालेल्या या राईस मिल्सना धान देऊन आता त्यांच्याकडून धानाची भरडाई केली जाईल.

टॅग्स :Marketबाजार