२९ महिला सांभाळणार सरपंचपदाची धुरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:45 IST2021-02-05T07:45:42+5:302021-02-05T07:45:42+5:30

गोरेगाव : तालुक्यात पंचायत समितीच्या सभागृहामध्ये तहसीलदार सचिन गोस्वामी यांच्या मार्गदर्शनात गुरुवारी (ता.२८) ५६ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदांचे आरक्षण सोडत ...

29 women will hold the post of Sarpanch | २९ महिला सांभाळणार सरपंचपदाची धुरा

२९ महिला सांभाळणार सरपंचपदाची धुरा

गोरेगाव : तालुक्यात पंचायत समितीच्या सभागृहामध्ये तहसीलदार सचिन गोस्वामी यांच्या मार्गदर्शनात गुरुवारी (ता.२८) ५६ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदांचे आरक्षण सोडत काढण्यात आली. सन २०२० ते २०२५ या वर्षासाठी हे आरक्षण काढण्यात आले. ५६ ग्रामपंचायतींपैकी २९ ग्रामपंचायतीवर महिला सरपंच आरूढ होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

आरक्षण सोडतीनुसार, तालुक्यात अनुसूचित जातीसाठी ७, त्यामध्ये ४ पदे महिलांसाठी, अनुसूचित जमातीसाठी ८ सरपंचपदे, त्यापैकी ५ पदे महिलांसाठी, नागरिकांचा मागास प्रवर्ग एकूण १५ सरपंच पदे, त्यामध्ये ७ महिलांसाठी राखीव, तर सर्वसाधारण सरपंचपदासाठी २६ पदे आरक्षित करण्यात आली. त्यामध्ये १३ सरपंच पदे महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले आहे. तालुक्यात एकूण ५६ ग्रामपंचायती असून, मुदत संपलेल्या २५ ग्रामपंचायतीच्या निवडणुका १५ जानेवारीला घेण्यात आल्या होत्या. १८ जानेवारीला निवडणुकीचा निकाल घोषित झाला. निवडणुकांपूर्वी सरपंचपदांचे आरक्षण घोषित झाले नव्हते, त्यामुळे अनेकांचा हिरमोड झाला होता. निवडणुकीनंतर २८ जानेवारीला सरपंच आरक्षण सोडत करण्यात आली. अनेक ठिकाणी स्पष्ट बहुमत असतानाही अनेक पॅनलकडे सरपंच पदांचे उमेदवारच नसल्याने गणित बिघडत दिसत आहे. सरपंच आरक्षण सोडतीमध्ये अनुसूचित जाती प्रवर्गासाठी कालीमाटी अनुसूचित जाती स्त्री, बघोली अनुसूचित जाती स्त्री, पिडकेपार अनु.जाती महिला, म्हसगाव अनु.जाती स्त्री, पालेवाडा अनु. जाती खुला, शहारवानी अनु. जाती खुला, मलपुरी अनु.जाती खुला.

एस.टी.प्रवर्ग अनुसूचित जमातीसाठी ८ सरपंचपदे आरक्षित करण्यात आली. त्यामध्ये मोहगाव,अनु. जमाती खुला, चोपा अनु. जमाती खुला, खाडीपार अनु.जमाती खुला, कुराडी अनु.जमाती खुला, पिपरटोला अनु.जमाती स्त्री, मुडीपार अनु.जमाती स्त्री, घोटी अनु.जमाती महिला, बबई अनु.जमाती महिला.

.....

नागरिकांचा मागास प्रवर्गसाठी १५ सरपंचपदे आरक्षित

चिल्हाटी नामाप्र स्त्री, पाथरी नामाप्र स्त्री, बोरगाव नामाप्र महिला, गोंदेखारी नामाप्र खुला, तिमेझरी नामाप्र खुला, झाजिया नामाप्र खुला, कटगी नामाप्र स्त्री, दवडीपार नामाप्र खुला, सिलेगाव नामाप्र खुला, कलपाथरी नामाप्र खुला, मोहगाव तिल्ली नामाप्र खुला, सटवा नामाप्र स्त्री, आंबेतलाव नामाप्र महिला, मेगाटोला नामाप्र खुला, आसलपानी नामाप्र स्त्री आरक्षित आहे.

....

सर्वसाधारणसाठी २६ सरपंचपदे आरक्षित

त्यामध्ये गिधाडी सर्वसाधारण स्त्री, मुरदोली सर्वसाधारण महिला, घुमरा सर्वसाधारण स्त्री, हिराटोला सर्वसाधारण स्त्री, तेलनखेडी सर्वसाधारण स्त्री, बोटे सर्वसाधारण स्त्री, सोनी सर्वसाधारण स्त्री, कवलेवाडा सर्वसाधारण स्त्री, सोनेगाव सर्वसाधारण स्त्री, तुमसर सर्वसाधारण स्त्री, कमरगाव सर्वसाधारण महिला, पूरगाव सर्वसाधारण महिला, डवा सर्वसाधारण महिला, निंबा सर्वसाधारण, होसीटोला सर्वसाधारण, तुमखेडा सर्वसाधारण, मोहाडी सर्वसाधारण, तिल्ली सर्वसाधारण, तेढा सर्वसाधारण, पलखेडा सर्वसाधारण, भडगा सर्वसाधारण, हिरापूर सर्वसाधारण, बाह्मनी सर्वसाधारण, चिचगाव सर्वसाधारण, गणखेरा सर्वसाधारण, हिरडामाली सर्वसाधारण अशा पद्धतीने सरपंचपदांचे आरक्षण घोषित करण्यात आले.

Web Title: 29 women will hold the post of Sarpanch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.