शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
2
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
3
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
4
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
5
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
6
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
7
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
8
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
9
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
10
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
11
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
12
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
13
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
14
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
15
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
16
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
17
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
18
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
19
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
20
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!

२८ हजार क्विंटल लाकडे होळीत होणार स्वाहा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2022 05:00 IST

अवैध दारू व्यवसायावर कारवाई करण्यासाठी पोलीस ठाणे स्तरावर तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पथक  स्थापन करण्यात आले आहेत. एकीकडे पर्यावरण संतुलनासाठी वनविभागाबरोबर प्रत्येक ग्रामपंचायती सरसावल्या आहेत; मात्र त्याच गावातील नागरिक जंगलातील, शेतातील लाकडे तोडून कोट्यवधीची वनसंपदा होळीसाठी नष्ट केली जाते. आज घडीला एक क्विंटल लाकडाची किंमत ८०० रुपये सांगितली जाते. या २८ हजार क्विंटल लाकडाची किंमत कोट्यवधी रुपयांच्या घरात आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया :  मोठ्या प्रमाणात झालेल्या वृक्षतोडीमुळे ग्लोबल वार्मिंगचे संकट उभे आहे. या समस्येवर मात करण्यासाठी शासनाने पर्यावरण ग्राम संतुलित योजना अंमलात आणली. या योजनेतून प्रत्येक गावाने रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे लावून शंभर कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण केले. तर दुसरीकडे जुन्या वृक्षांची कत्तल करून ते होळीत स्वाहा केले जात आहेत. यंदा  होळीला जिल्ह्यात १३८७ सार्वजनिक व तर १४२० ठिकाणी खासगी होळ्या जाळल्या जात आहेत. यातील २८०७ होळींमध्ये २८ हजार ७० क्विंटल लाकडे जाळली गेली आहेत. या लाकडांची किंमत कोट्यवधी रुपयांच्या जवळपास आहे.जिल्ह्यात गुरुवार (दि.१७) होलीका दहन तर शुक्रवारी (दि.१८) धुळवड साजरी होत आहे. होळीचा सण उत्साहात व शांततेत पार पडावा यासाठी गुरुवार व शुक्रवारी  पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे. यंदा शहर पोलीस ठाण्यांतर्गत शहर हद्दीत १३० सार्वजनिक व २४० खासगी होळी, रामनगर पोलीस ठाणे हद्दीत ५५ सार्वजनिक होळी, गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्यांतर्गत ५० सार्वजनिक होळी व १६० खासगी होळी, रावणवाडी पोलीस ठाण्यांतर्गत ७२ सार्वजनिक व १०८ खासगी होळी, तिरोडा पोलीस ठाण्यांतर्गत १० सार्वजनिक व ७० खासगी होळी, गंगाझरी पोलीस ठाण्यांतर्गत ४८ सार्वजनिक व ६० खासगी होळी, दवनीवाडा पोलीस ठाण्यांतर्गत ३५ सार्वजनिक होळी व २५ खासगी होळी, आमगाव पोलीस ठाण्यांतर्गत ७२ सार्वजनिक होळी व ८८ खासगी होळी, गोरेगाव पोलीस ठाण्यांतर्गत १७० सार्वजनिक व ७० खासगी होळींचे दहन होणार अहे. सालेकसा पोलीस ठाण्यांतर्गत १९० सार्वजनिक व ३० खासगी होळी, देवरी पोलीस ठाण्यांतर्गत २३५ सार्वजनिक व २७ खासगी होळी, चिचगड पोलीस ठाण्यांतर्गत ५० सार्वजनिक व २० खासगी होळी, केशोरी पोलीस ठाण्यांतर्गत ३० सार्वजनिक व ३२५ खासगी होळी, अर्जुनी-मोरगाव पोलीस ठाण्यांतर्गत ९० सार्वजनिक व ५२ खासगी होळी, नवेगावबांध पोलीस ठाण्यांतर्गत ४५ सार्वजनिक  व १० खासगी होळी, डुग्गीपार पोलीस ठाण्यांतर्गत २५ सार्वजनिक व ५० खासगी होळी अशा प्रकारे जिल्ह्यात एकूण १३८७ सार्वजनिक तर १४२० खासगी होलीका दहन करण्यात येतील. 

चोख बंदोबस्त- होळीचा सण शांततेत आणि निर्भय व मोकळ्या वातावरणात पार पाडण्याकरिता पोलीस दलातर्फे सर्व पोलीस ठाण्यांच्या हद्दीत चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे. अवैध दारू व्यवसायावर कारवाई करण्यासाठी पोलीस ठाणे स्तरावर तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पथक  स्थापन करण्यात आले आहेत. एकीकडे पर्यावरण संतुलनासाठी वनविभागाबरोबर प्रत्येक ग्रामपंचायती सरसावल्या आहेत; मात्र त्याच गावातील नागरिक जंगलातील, शेतातील लाकडे तोडून कोट्यवधीची वनसंपदा होळीसाठी नष्ट केली जाते. आज घडीला एक क्विंटल लाकडाची किंमत ८०० रुपये सांगितली जाते. या २८ हजार क्विंटल लाकडाची किंमत कोट्यवधी रुपयांच्या घरात आहे. ट्रायकिंग फोर्सचा बंदोबस्त करणार- होळीच्या सणाला समाजकंटक, समाज विघातक, मूलतत्त्ववादी व गुंड प्रवृत्तीचे इसम मद्यप्राशन करून अश्लील वक्तव्य करणाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी जिल्ह्यात ट्रायकिंग फोर्सचा बंदोबस्त लावला आहे. धार्मिक स्थळावर गुलाल उधळणे, मुलींची छेडखानी करणे, होळी प्रथम कुणी पेटवावे,एकमेकांच्या अंगावर गुलाल रंग, फुग्यांमध्ये पाणी भरून मारणे, चिखल अंगावर टाकणे, ढोल-ताशे वाजवून नाचत गाजत फगवा काढणे, जुन्या वैमनस्यातून वाद निर्माण करणे, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवणाऱ्यावर पोलिसांची करडी नजर राहणार आहे.

 

टॅग्स :Holiहोळी 2022pollutionप्रदूषण