वडेगावच्या सेवा संस्थेत २.८० लाखांचा अपहार

By Admin | Updated: May 31, 2015 00:55 IST2015-05-31T00:55:11+5:302015-05-31T00:55:11+5:30

वडेगाव येथील सेवा सहकारी संस्थेत सचिव म्हणून नोकरी करणाऱ्या एका इसमाने २ लाख ८० हजार रुपयाचा अपहार

2.80 lakhs in Wadegaon services agency | वडेगावच्या सेवा संस्थेत २.८० लाखांचा अपहार

वडेगावच्या सेवा संस्थेत २.८० लाखांचा अपहार

गुन्हा दाखल : सचिवाने केला प्रताप
तिरोडा : वडेगाव येथील सेवा सहकारी संस्थेत सचिव म्हणून नोकरी करणाऱ्या एका इसमाने २ लाख ८० हजार रुपयाचा अपहार केल्याप्रकरणी तिरोडा पोलिसात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. शोभाराम कवडू खोब्रागडे रा. ठाणेगाव असे आरोपीचे नाव आहे.
१ एप्रिल २००९ ते ३० जून २०१३ या काळात त्याने संस्थेचे कर्जदार सायात्राबाई सोनवाने यांच्या कर्जाची ५६ हजार ४७० रुपये रक्कम घेतली. परंतु संस्थेच्या कॅशबुकमध्ये खोटा हिसोब लिहून फक्त २१ हजार ३०० रुपये खात्यात जमा केले. ॉ
संस्थेच्या पावती पुस्तकामध्ये खोडाखोड करुन ३५ हजार १७० रुपये तसेच कॅशबुकमध्ये तीन लोकांच्या नावे हिस्से परत करून २५ हजार ४४५ रुपये अपहार केला. संस्थेतील एकूण २ लाख ८० हजार १३७ रुपयांचा अपहार करणाऱ्या शोभाराम खोब्रागडे विरुद्ध गिरधर बिसेन यांच्या तक्रारीवरुन भादंवि कलम ४२०, ४०६, ४०९, ४६५, ४६८, ४७७ अ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. यात आणखी आरोपी असण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)

Web Title: 2.80 lakhs in Wadegaon services agency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.