२७ हजारांची विदेशी दारू पकडली

By Admin | Updated: December 1, 2015 05:52 IST2015-12-01T05:52:31+5:302015-12-01T05:52:31+5:30

अवैध दारू विक्रीचा प्रकार दिवसेंदिवस वाढतच जात असताना गोरेगाव पोलिसांनी गावातीलच एका अवैध दारू विके्र

27 thousand foreign liquor was caught | २७ हजारांची विदेशी दारू पकडली

२७ हजारांची विदेशी दारू पकडली

गोरेगाव : अवैध दारू विक्रीचा प्रकार दिवसेंदिवस वाढतच जात असताना गोरेगाव पोलिसांनी गावातीलच एका अवैध दारू विके्र त्याकडून २७ हजार ४५० रूपयांची विदेशी दारू जप्त केली. ही कारवाई शनिवारी (दि.२८) रात्री ११ वाजतादरम्यान करण्यात आली असून दारू विके्र त्याला अटक करण्यात आली आहे.
अवैध दारू विक्रीच्या प्रकारावर आळा घालण्यासाठी जिल्ह्यात पोलीस विभागाकडून सातत्याने कारवाया केल्या जात आहेत. यात मोठ्या प्रमाणात दारू पकडली जात असून दारू भट्याह फोडल्या जात आहेत. मात्र दारू विक्रीचे हा प्रकार काही कमी होत नाहीत. अशात गावातीलच हेमंत बंसीलाल पद्माकर या अवैध दारू विके्रत्याच्या घरावर पोलिसांनी धाड घातली.
या धाडीत पोलिसांनी त्याच्या घरातून रॉयल स्टॅग या विदेशी दारूचे ४२ पव्वे जप्त केले. जप्त केलेल्या दारूची किंमत २७ हजार ४५० रूपये असून हेमंतला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी मुंबई दारू बंदी कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविला आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक रविंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक भरत कराडे, पोलीस उपनिरीक्षक पवन मोरे, हवालदार जायभाई, वरखडे, शहारे, पोटफोडे व मडावी यांनी केली. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: 27 thousand foreign liquor was caught

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.