२६८१८ शेतकऱ्यांचे अवकाळी पावसाने नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2019 06:00 AM2019-11-07T06:00:00+5:302019-11-07T06:00:18+5:30

गोंदिया जिल्ह्याचे मुख्य पीक धान आहे. वर्षातून पावसाळी पिकावरच शेतकऱ्यांचा जोर असतो. यंदा उशीरा आलेला पाऊस खूप लांबल्यामुळे हलक्या धानाचे नुकसान झाले. कापणीवर आलेले धान शेतातच असताना पावसाने दम सोडला नाही. आठ दिवसासाठी पाऊस बंद झाल्याने आता पाऊस येणार नाही असे शेतकऱ्यांना वाटल्याने आलेले धान कापणे सुरू केले.

26818 Farmers suffer premature rainfall | २६८१८ शेतकऱ्यांचे अवकाळी पावसाने नुकसान

२६८१८ शेतकऱ्यांचे अवकाळी पावसाने नुकसान

Next
ठळक मुद्दे७८१ गावातील शेतकऱ्यांना फटका : १४ हजार हेक्टरमधील पीक संकटात

नरेश रहिले ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : दिवाळीच्या पूर्वीपासूनच धान कटाईला सुरूवात होते. परंतु यंदा पावसाने थैमान घातल्याने हातात येणारे पीकही वाया गेले. अवकाळी पावसामुळे गोंदिया जिल्ह्यातील १३ हजार ७६७.९२ हेक्टर मधील धानपिकाचे नुकसान झाले. या नुकसानीचा फटका जिल्ह्यातील २६ हजार ८१८ शेतकऱ्यांना बसला आहे. जिल्ह्यातील ७८१ गावात परतीच्या पावसाचा कहर दिसून येत आहे.
गोंदिया जिल्ह्याचे मुख्य पीक धान आहे. वर्षातून पावसाळी पिकावरच शेतकऱ्यांचा जोर असतो. यंदा उशीरा आलेला पाऊस खूप लांबल्यामुळे हलक्या धानाचे नुकसान झाले. कापणीवर आलेले धान शेतातच असताना पावसाने दम सोडला नाही. आठ दिवसासाठी पाऊस बंद झाल्याने आता पाऊस येणार नाही असे शेतकऱ्यांना वाटल्याने आलेले धान कापणे सुरू केले. परंतु वातावरणाच्या बिघाडामुळे परतीच्या पावसाने झोडपले व त्यामुळे शेतकऱ्यांचे धान पाण्यात सापडले. जिल्ह्यातील ७८१ गावांतील २६ हजार ८१६ शेतकऱ्यांचे नुकसान झाले असल्याचा अहवाल जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने तयार केला आहे.
जिल्ह्यातील एक लाख ९१ हजार ९.६० हेक्टर क्षेत्रात धान पीक लावण्यात आले आहे. त्यातील १३ हजार ७६७.९२ टक्के धानाचे अवकाळी पावसामुळे नुकसान झाले. ३३ टक्क्यापेक्षा कमी नुकसान असलेल्या १५ हजार १०७ शेतकऱ्यांचे सात हजार ८४९.५२ हेक्टर धान पीकाचे नुकसान झाले. तर ३३ टक्क्यापेक्षा अधिक ११ हजार ७११ शेतकऱ्यांचे पाच हजार ९१८.४० हेक्टर धानपीकाचे नुकसान झाले. सर्वात जास्त नुकसान तिरोडा तालुक्यातील शेतकऱ्यांचे झाले. नुकसानग्रस्त असलेल्या शेतकºयांच्या संख्येत गोंदिया तालुक्यात २९८७, तिरोडा तालुक्यात ५६७५, आमगाव तालुक्यात ४५३६, सालेकसा तालुक्यात १३८६, देवरी तालुक्यात ९८७, गोरेगाव तालुक्यात ४६३९, सडक-अर्जुनी तालुक्यात २२१८, अर्जुनी-मोरगाव तालुक्यात ४३९० असे एकूण २६ हजार ८१८ शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. या नैसर्गीक आपदेत संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना तत्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी होत आहे.

७२८६ शेतकºयांचे पंचनामे अद्याप झाले नाही
पाऊस आला व कापणी झालेल्या कळपा पाण्यात गेल्या. यात शेतकºयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यातील १५ हजार ८८१ शेतकऱ्यांच्या शेतात कृषी विभागाला पोहचता आले असून उर्वरीत सात हजार २८६ शेतकऱ्यांच्या शेतात कृषी विभागाचे अधिकारी-कर्मचारी पोहचले नाहीत. गोंदिया तालुक्यातील १०६६, आमगाव तालुक्यातील २६२, सालेकसा तालुक्यातील १६०, देवरी तालुक्यातील ७११, गोरेगाव तालुक्यातील १२८०, सडक-अर्जुनी तालुक्यातील ९२३, अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील २८८४ अशा सात तालुक्यातील सात हजार २८६ शेतकऱ्यांच्या धानाचे अद्याप पंचनामे झाले नाहीत.
३७५१ शेतकऱ्यांनीच काढला विमा
अवकाळी पावसामुळे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्या शेतकºयांची संख्या २६ हजार ८१६ आहे. ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्यातील फक्त तीन हजार ७५१ शेतकऱ्यांनी पीक विमा घेतला होता. गोंदिया जिल्ह्यात ७० हजार ३१ शेतकऱ्यांनी पीक विमा घेतला होता. परंतु ज्या २६ हजार ८१६ शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्यांची चौकशी केली असता पीक विमा करणारे तीन हजार ७५१ शेतकरी आढळले. पीक विमा घेणाऱ्या तीन हजार ७५१ शेतकºयांचे नुकसान झालेले क्षेत्र एक हजार १६१.०५ हेक्टर असल्याची माहिती कृषी विभागाने दिली.

Web Title: 26818 Farmers suffer premature rainfall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस