५१ योजनांवर २६.५३ कोटी खर्च

By Admin | Updated: May 18, 2016 02:00 IST2016-05-18T02:00:30+5:302016-05-18T02:00:30+5:30

ग्रामीण भागातील नागरिकांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे यासाठी राज्यात मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल

26.53 crore expenditure on 51 schemes | ५१ योजनांवर २६.५३ कोटी खर्च

५१ योजनांवर २६.५३ कोटी खर्च

गोंदिया : ग्रामीण भागातील नागरिकांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे यासाठी राज्यात मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमाची घोषणा ७ मे रोजी राज्य शासनाने केली आहे. यांतर्गत राज्यातील बहुतांश जिल्हयात स्वतंत्र योजना कार्यान्वीत केल्या जात आहे. याकरिता चार वर्षांसाठी हा कार्यक्रम बनविण्यात आला आहे.
यांतर्गत जिल्ह्यातील आमगाव तालुक्यात दहेगाव येथे ५९.०३ लाख रूपये, देवरी तालुक्यातील भर्रेगाव येथे ४७.०२ लाख, पिंकडेपार येथे ३३.१६ लाख, सावली येथे ३२.४२ लाख, सिरपूरबांध येथे ३०.१५ लाख, गोंदिया तालुक्यातील चंगेरा येथे ५६.३७ लाख, गुदमाच्या आवरीटोला व जमाटोला येथे ९१.५२ लाख, नवरगा खुर्द येथे ६२.४६ लाख, पांजरा येथे ८४.४० लाख, पोवारीटोला येथे ५६.३७ लाख, रापेवाडा येथे ५६.३७ लाख, सहेसपुर येथे ६५.८६ लाख, लोहारा येथे ४१.११ लाख, सतोना येथे ७६.१५ लाख, सावरी येथे ५९.४३ लाख, मोगर्रा येथे ५८.१४ लाख, गोरेगाव तालुक्यातील दवडीपार येथे ५८.१८ लाख, कलपाथरी येथे ४२.१६ लाख, मुरदोली येथे ५५.१८ लाख, पालेवाडा येथे ५५.८७ लाख, पिंडकेपार येथे ५६.३७ लाख, पुरगाव येथे ७५.१४ लाख, शहारवानी येथे ८२.४७ लाख, सडक-अर्जुनी तालुक्यातील घाटबोरी तेली येथे ४९.२२ लाख, घटेगाव येथे ४७.०४ लाख, गिरोला येथे ४९.०४ लाख, खाडीपार येथे ३३.४२ लाख, सितेपार येथे ४३.५० लाख, कोहळीटोला येथे ३९.३२ लाख, सालेकसा तालुक्यातील निंबा येथे ५८.२८ लाख, तिरोडा तालुक्यातील डब्बेटोला येथे ५९.९५ लाख, गराडा येथे ६४.२२ लाख, गुमाधावडा येथे ७०.९५ लाख, खैरलांजी येथे ३६.६८ लाख, कोडेलोहारा येथे ११४.४० लाख, मुरवाडी येथे २७.२० लाख, नवेगाव खुर्द येथे ३५.६० लाख, खुरखुडी येथे ३६.१९ लाख रूपयांचा खर्च करून स्वतंत्र योजना कार्यान्वीत केल्या जाणार आहेत.
याशिवाय जिल्ह्यातील काही ठिकाणांवर पूर्वीपासूनच असलेल्या योजनांची दुरूस्ती करण्याचेही नियोजन करण्यात आले आहे. यात सडक-अर्जुनी तालुक्यातील ग्राम चिखली येथे ८१.३० लाख, डव्वा येथे १०२.२० लाख, डोंगरगाव खुर्द येथे ४२.६५ लाख, घोटी येथे ९.३२ लाख, कनेरीराम येथे ३५.९८ लाख, खजरी येथे २६.२४ लाख, पळसगाव येथे ३५.२१ लाख, सौंदड येथे २९.२४ लाख, वडेगाव येथे ३३.६५ लाख रूपये खर्च केले जाणार आहेत.
तसेच सडक-अर्जुनी तालुक्यातील बाम्हणी येथे १० लाख, पुतळी येथे ६० लाख तर सालेकसा तालुक्यातील लटोरी येथे ५० लाख रूपये खर्च केले जाणार आहेत. या तिन्ही योजना प्रादेशिक नवीन पाणी पुरवठा योजनेच्या नावावर नोंद आहेत. या योजना तयार होऊन कार्यान्वीत झाल्यास पाण्यासाठी नागरिकांची भटंकती थांबणार. (शहर प्रतिनिधी)

चार वर्षांत मिळणार पाणी
मुख्यमंत्री ग्रामीण पाणी पुरवठा कार्यक्रम नुकताच राज्य शासनाने हाती घेतला आहे. सर्वसामान्य जनतेला पाण्याची पूर्तता करणे हा या कार्यक्रमाचा हेतू आहे. यासाठी आर्थिक वर्ष २०१६-१७ ते २०१९-२० दरम्यान लक्ष्य निर्धारीत केले आहेत. आता या कालावधीत या योजना पूर्ण होतात काय हे बघायचे आहे. वास्तवीक या कार्यक्रमातील दिशानिर्देश तय करण्यात आले आहेत. त्यातही विशेष म्हणजे निधी उपलब्ध करणे असून वेळेवर निधी मिळाल्यास या योजना वेळेत पूर्ण होणार.

Web Title: 26.53 crore expenditure on 51 schemes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.