२६२ प्रेमवीरांचे घडविले शुभमंगल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2016 01:47 IST2016-03-28T01:47:04+5:302016-03-28T01:47:04+5:30

जातीयवादाला थारा न देता सर्वधर्म समभावाची संकल्पना साकारण्यासाठी जिल्ह्यातील महात्मा गांधी तंटामुक्त गाव

262 Premchir's Shubhamangal | २६२ प्रेमवीरांचे घडविले शुभमंगल

२६२ प्रेमवीरांचे घडविले शुभमंगल

नरेश रहिले ल्ल गोंदिया
जातीयवादाला थारा न देता सर्वधर्म समभावाची संकल्पना साकारण्यासाठी जिल्ह्यातील महात्मा गांधी तंटामुक्त गाव समित्यांनी पुढाकार घेतला आहे. ही मोहीम सुरू झाल्यापासून आजपर्यंत समित्यांनी जिल्ह्यात १७० आंतरजातीय तर ९२ प्रेमविवाह घडवून आणले.
जिल्ह्यातील १६ पोलीस ठाण्यांतर्गत ५५६ महात्मा गांधी तंटामुक्त गाव समित्या असून या समित्यांनी आंतरजातीय व प्रेमविवाह घडवून आणले. गोंदिया शहर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या तंटामुक्त समित्यांनी ११ आंतरजातीय विवाह घडवून आणले. गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या तंटामुक्त समित्यांनी ६ आंतरजातीय तर ६ प्रेमविवाह घडवून आणले. रावणवाडी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या तंटामुक्त समित्यांनी ३ आंतरजातीय आणि ५ प्रेमविवाह घडवून आणले. तिरोडा पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या तंटामुक्त समित्यांनी ९ आंतरजातीय तर ५ प्रेमविवाह घडवून आणले. गंगाझरी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या तंटामुक्त समित्यांनी ७ प्रेमविवाह घडवून आणले. दवनीवाडा पोलीस ठाण्यांतर्गत तंटामुक्त समित्यांनी ६ आंतरजातीय तर ६ प्रेमविवाह घडवून आणले आहेत.
आमगाव पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या तंटामुक्त समित्यांनी ८ आंतरजातीय घडवून आणले. सालेकसा पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या तंटामुक्त समित्यांनी ३० आंतरजातीय तर २० प्रेमविवाह घडवून आणले. अविकसित आणि नक्षलग्रस्त असताना सुद्धा या भागात झालेले हे आंतरजातीय विवाह कौतुकास्पद ठरत आहे.
गोरेगाव पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या तंटामुक्त समित्यांनी ११ आंतरजातीय तर ५ प्रेमविवाह घडवून आणले. देवरी पोलीस ठाण्यांतर्गत तंटामुक्त समित्यांनी ८ प्रेमविवाह घडवून आणले. चिचगड पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या तंटामुक्त समित्यांनी ६ आंतरजातीय तर ८ प्रेमविवाह घडवून आणले. अर्जुनी/मोरगाव पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या तंटामुक्त समित्यांनी १६ आंतरजातीय तर २ प्रेमविवाह घडवून आणला. केशोरी पोलीस ठाण्यांतर्गत तंटामुक्त समित्यांनी ४ आंतरजातीय तर ९ प्रेमविवाह घडवून आणले. नवेगावबांध पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या तंटामुक्त समित्यांनी ५ आंतरजातीय तर ७ प्रेमविवाह घडवून आणले. डुग्गीपार पोलीस ठाण्यांतर्गत ४९ आंतरजातीय विवाह घडवून आणण्यात तंटामुक्त गाव समित्यांना यश आले आहे.
जिल्ह्यात एकूण १७० आंतरजातीय तर ९२ प्रेमविवाह समित्यांनी घडवून आणले. या विवाहांना सुरूवातीला मुलगा व मुलगी यांच्या नातेवाईकांचा तीव्र विरोध असायचा. मात्र तंटामुक्त समितीच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे समुपदेशन केले आणि कुठे आई-वडिलांच्या संमतीने तर कुठे त्यांच्या विरोधाला न जुमानता सज्ञान प्रेमी युगलांचे विवाह लावून दिले.

असे केले सामाजिक कार्य
४राज्य शासनाने सुरू केलेल्या महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीने गावातील तंटे गावातच सामोपचाराने सोडविण्याबरोबर जातीय सलोखा कायम राखणे, अंधश्रध्दा निर्मूलन करणे, स्त्री भू्रणहत्येवर आळा घालणे, महिला सक्षमीकरणासाठी कार्य करणे, वृक्षारोपण करणे व गावाच्या विकासासाठी सण, उत्सव, मेळावे पोलीस बंदोबस्ताशिवाय शांततेत पार पाडणे, महापुरूषांच्या जयंत्या, पुण्यतिथ्या शांततेत पार पाडण्यासाठी समित्यांनी प्रयत्न केले. इतकेच नाही तर जातीय बंधनांना झुगारून गावात आंतरजातीय विवाहाचा पायंडा तंटामुक्त समित्यांनी घातला.

Web Title: 262 Premchir's Shubhamangal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.