देयक भरणातून मिळाले २.५४ कोटी

By Admin | Updated: November 18, 2016 01:45 IST2016-11-18T01:45:46+5:302016-11-18T01:45:46+5:30

राज्य शासनाच्या आदेशावरून महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीकडून देयकांच्या भरणासाठी ५०० व १००० रूपयांची नोट स्वीकारण्यात येत आहे.

2.54 crore received from payment of payment | देयक भरणातून मिळाले २.५४ कोटी

देयक भरणातून मिळाले २.५४ कोटी

महावितरणला सुखद शॉक : १७ ग्राहकांनी भरली थकबाकी
गोंदिया : राज्य शासनाच्या आदेशावरून महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीकडून देयकांच्या भरणासाठी ५०० व १००० रूपयांची नोट स्वीकारण्यात येत आहे. यात महावितरणला १० ते १४ या कालावधीत दोन कोटी ५४ लाख रूपयांची आवक झाली आहे. महावितरणसाठी हा सुखद शॉक असून जुन्या नोटा स्वीकारण्यासाठी आणखी २४ तारखेपर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याने महावितरणच्या तिजोरीत आणखीही भर पडणार असल्याची शक्यता नाकारता येत नाही.
५०० व १००० रूपयांच्या नोटबंदीने अवघ्या देशातच खळबळ माजली आहे. अशात ज्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात ५०० व १००० नोटा आहेत, त्यांची या नोटा खर्च करण्यासाठी धावपळ सुरू आहे. मात्र जुन्या नोटांचा व्यवहार सामान्य व्यापारी करीत नसल्याने पंचाईत अधीक वाढली आहे. अशात राज्य शासनाने कर व देयकांचा भरणा करण्यासाठी नागरिकांना सुविधा देत ५०० व १००० रूपयांच्या नोटा स्वीकारण्याचे आदेश काढले. शासकीय कार्यालयांसाठी हे आदेश बंधनकारक असतानाच महावितरणकडूनही जुन्या नोटा स्वीकारल्या जात आहेत.
यातून महावितरणला गोंदिया जिल्ह्यात दोन कोटी ५४ लाख रूपयांचे उत्पन्न मिळाले आहे. यात १७ हजार ५२३ ग्राहकांनी १० ते १४ नोव्हेंबर दरम्यान ही रक्कम भरली आहे. विशेष म्हणजे यात ११ तारखेला सर्वाधीक एक कोटी १२ लाख रूपयांचे उत्पन्न महावितरणला मिळाले आहे. विशेष म्हणजे शासनाच्या आदेशावरून ५०० व १००० रूपयांच्या नोटा येत्या २४ तारखेपर्यंत स्वीकारण्यात येणार आहेत. त्यामुळे महावितरणच्या तिजोरीत या कालावधीत आणखीही भर पडणार यात शंका नाही. (शहर प्रतिनिधी)


कर्मचारी पोहोचले थकबाकीदारांकडे
येत्या २४ तारखेपर्यंत जुन्या नोटा स्वीकारण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. उरलेल्या अवधीत नागरिकांना त्यांच्याकडील जुन्या नोटांचा वापर करता येणार आहे. त्यामुळे वीज कंपनीचे कर्मचारी थकबाकीदारांकडे जात असून या संधीचा लाभ घेऊन वीज देयक भरून थकबाकीमुक्त व्हावे यासाठी थकबाकीदारांंना पे्ररीत करीत आहेत. शिवाय वीज देयक भरण्यासाठी येणाऱ्या थकबाकीदारांच्या सुविधेसाठी वीज कंपनीचे कर्मचारी वीज देयक भरणा केंद्रावरील कर्मचाऱ्यांची मदत करीत आहेत.

Web Title: 2.54 crore received from payment of payment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.