परिणय सूत्रात बांधली जाणार २५ जोडपी

By Admin | Updated: April 30, 2016 01:48 IST2016-04-30T01:48:57+5:302016-04-30T01:48:57+5:30

बौद्ध सामूहिक विवाहाचे प्रथम संस्थापक अ‍ॅड. ए. बी. बोरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सन १८८९ मध्ये (सम्राट बौद्ध विहार) प्रभात वाचनालय, गांधी वार्ड गोंदिया येथील सभेत ....

The 25 couples to be built in the formulas | परिणय सूत्रात बांधली जाणार २५ जोडपी

परिणय सूत्रात बांधली जाणार २५ जोडपी

विविध समित्या गठित : रविवारी बौद्ध सामूहिक विवाह
गोंदिया : बौद्ध सामूहिक विवाहाचे प्रथम संस्थापक अ‍ॅड. ए. बी. बोरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सन १८८९ मध्ये (सम्राट बौद्ध विहार) प्रभात वाचनालय, गांधी वार्ड गोंदिया येथील सभेत बौद्ध सामूहिक विवाह आयोजित करण्याचे ठरविण्यात आले होते. आता बौद्ध सामूहिक विवाहाचे नियमित हे २८ वे वर्ष आहे. १ मे रोजी सकाळी ११.३० वाजता विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अस्थिकलश परिसर स्थळ भीमघाट येथे बौद्ध पद्धतीने २५ जोडप्यांना मंगल परिणयाच्या सूत्रात बांधण्यात येणार आहे.
अध्यक्षस्थानी अ‍ॅड.ए.बी. बोरकर राहतील. याप्रसंगी प्रामुख्याने माजी केंद्रीय मंत्री तथा खा. प्रफुल्ल पटेल, पालकमंत्री तथा सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, आ. गोपालदास अग्रवाल, आ. राजेंद्र जैन, अ‍ॅड.के.आर. शेंडे, जि.प. अध्यक्ष उषा मेंढे, नगराध्यक्ष कशिश जायस्वाल, के.बी. चव्हाण, सुशीला भालेराव उपस्थित राहतील.
भीमघाट परिसर सुसज्ज करण्यासाठी बौद्ध विवाह समिती व भीमघाट स्मारक समितीचे पदाधिकारी श्रमदान करीत आहेत. बौद्ध सामूहिक विवाह सुनिश्चित करण्यासाठी विविध समित्यांची आखणी व बांधणी करून निर्धारित कामांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
यात मंडप, बिछायत, कुलर, पंखे आदींची जबाबदारी श्रमदान समितीवर सोपविण्यात आली असून यात राजू दोनोडे, लक्ष्मीकांत डहाट, श्याम चवरे, भाऊदास डोंगरे, अनुनाथ भिमटे यांचा समावेश आहे. स्टेज, गेट, अस्थिकलश, सजावट, बॅनर, तोरण समितीमध्ये कमलेश वासनिक, कमलेश वैद्य, कपिल नागदेवे, बंटी मेश्राम, सावजी मेश्राम, दीपक वाहणे व इतर मित्रांचा समावेश आहे. पाणी पुरवठा समितीमध्ये डोंगरे, वर्षा, समता सैनिक दल व इतर, वर-वधू देखभाल समितीमध्ये गीता चव्हाण, शील मेश्राम, सुरेंद्र बन्सोड, दीपिका वाहणे, मोठा गोंदिया महिला मंडळ तसेच गोविंदपूर पाटलीपूत्र बुद्ध विहार मंडळ सांभाळणार आहे. भोजन वाढणे व स्वयंपाक समितीमध्ये सिद्धार्थ गणवीर, विजू डोंगरे, कपिल नागदेवे, मंजुश्री बोरकर, एन.टी. बोरकर, नागेश वानखेडे, विजय गजभिये, सुभाष चव्हाण व छोटा गोंदियाचे तरूण सहकार्य करणार आहेत. तक्रार व उपचार समितीमध्ये डॉ.पी.सी. भिमटे, डॉ. गणवीर, डॉ. वैद्य, सुशील ठवरे, भुपेंद्र वैद्य, जयेश बन्सोड, सावंत बोरकर व क्रीडा मंडळ गांधीवार्ड यांचा समावेश आहे.
कार्यक्रमासाठी सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष अनिल सुखदेवे, महेंद्र कठाणे व सर्व पदाधिकारी तसेच समता सैनिक दलाचे सैनिक सहकार्य करीत आहेत.

Web Title: The 25 couples to be built in the formulas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.