आंतरजिल्हा बदलीत येणार २३२ प्रस्ताव

By Admin | Updated: June 3, 2016 01:38 IST2016-06-03T01:38:47+5:302016-06-03T01:38:47+5:30

तेव्हापर्यंत ....

232 proposals to be transferred to Inter-city | आंतरजिल्हा बदलीत येणार २३२ प्रस्ताव

आंतरजिल्हा बदलीत येणार २३२ प्रस्ताव

पती-पत्नी एकत्रीकरणाचे ३७ : केवळ १५ प्रस्तावांना मिळाली मंजुरी
गोंदिया : गोंदिया जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून आंतरजिल्हा बदलीची प्रक्रिया सुरू आहे. परंतु बिंदुनामावलीचे काम होत नाही तेव्हापर्यंत कोणत्या संवर्गातील किती पदे रिक्त आहेत याची माहिती अधिकारी स्पष्ट करू न शकल्यामुळे आंतरजिल्हा बदलीची काही प्रकरणे थांबली आहेत. जिल्ह्यातून बाहेर जाणारे ६२ प्रस्ताव असून जिल्ह्यात येण्यासाठी २३२ प्रस्ताव आहेत.
संचमान्यतेमुळे अतिरिक्त शिक्षकांची संख्या राज्यात वाढत आहे. गोंदिया जिल्हा परिषदेअंतर्गत अनेक शाळांमध्ये अनेक विषयाचे शिक्षक नव्हते. संचमान्यतेमुळे ४९० अतिरिक्त शिक्षक होते. त्यापैकी ४६० शिक्षकांचे विषय शिक्षक म्हणून समायोजन झाले. मागील पाच वर्षापासून विषय शिक्षक नसल्याची ओरड होती. शासनाच्या संचमान्यता या धोरणामुळे अतिरिक्त शिक्षक होत आहेत.
त्यामुळे राज्यातील सात हजाराच्या घरात शिक्षक अतिरिक्त आहेत. त्यामुळे आंतरजिल्हा बदलीचे प्रकरण निकाली काढण्यास मोठी कसरत करावी लागत आहे. गोंदिया जिल्ह्याच्या आस्थापनेवर असलेले ६२ शिक्षक आंतरजिल्हा बदलीत जिल्हा सोडून जाण्यास तयार आहेत. परंतु जिल्ह्यात येण्यासाठी २३२ शिक्षकांचे प्रस्ताव आहेत.
संचमान्यतेमुळे ५१ शिक्षक आताही अतिरिक्त आहेत. परंतु लवकरच ही समस्या सुटणार आहे. आंतरजिल्हा बदलीसाठी आलेल्या ६२ पैकी १५ प्रस्तावांना मंजूरी देण्यात आली आहे. काही प्रस्तावात तृट्या आहेत, त्या पुर्ण करण्याची प्रक्रिया कार्यालयाकडून सुरू आहे. आंतरजिल्हा बदलीची प्रक्रिया सुरू असून आपसात आंतरजिल्हा बदलीचे १२ प्रस्ताव निकाली काढण्यात आले आहेत.
समायोजन झाले, विषय शिक्षकांची नियुक्ती झाली, पदोन्नती पुढे आहे. सेवानिवृत्त शिक्षकांच्या जागा रिक्त होत आहेत. त्यामुळे अतिरिक्त असलेल्या ५१ शिक्षकांचा प्रश्न लवकरच सुटत आहे. शासनाच्या निर्देशानुसार जुलै महिन्यात या संदर्भात कार्यवाही करण्यात येणार आहे. गेल्या तीन वर्षांपासून आंतरजिल्हा बदलीचे प्रस्ताव पडून आहेत. मात्र त्यांना दिलासा मिळालेला नाही.
प्राथमिक शिक्षकांची बिंदुनामावली प्रवर्ग निहाय जागा किती आहेत याची माहिती काढण्यात येणार आहे. बिंदुनामावलीनंतर प्राधान्यक्रमाने सेवाजेष्ठतेनुसार सर्व पात्र प्रस्तावांना मंजुरी देण्यात येणार आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: 232 proposals to be transferred to Inter-city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.