२२१ गर्भपात अविवाहित मुलींचे!
By Admin | Updated: March 8, 2016 02:02 IST2016-03-08T02:02:58+5:302016-03-08T02:02:58+5:30
आजघडीला सर्व स्तरातून महिलांचा सन्मान होत असताना भावनेच्या आहारी जाऊन समाजकंटकांच्या कृत्याला बळी

२२१ गर्भपात अविवाहित मुलींचे!
नरेश रहिले ल्ल गोंदिया
आजघडीला सर्व स्तरातून महिलांचा सन्मान होत असताना भावनेच्या आहारी जाऊन समाजकंटकांच्या कृत्याला बळी पडणाऱ्या अल्पवयीन मुलींची संख्या समाजात बऱ्याच प्रमाणात आहे. त्यामुळे त्या मुलींचे लैंगिक शोषण करून त्यांना गर्भधारणेच्या अवस्थेपर्यंत मजल मारल्या गेली. त्यामुळे मागील पाच वर्षात गोंदिया जिल्ह्यातील २२१ अविवाहीत मुलींचा गर्भपात करावा लागला.
प्रौगंडावस्थेतील मुलींना प्रेमाच्या भूलथापा देत त्यांचे लैंगिक शोषण करणारे समाजात काही कमी नाही. आई- वडीलांनी मुला-मुलींकडे केलेले दुर्लक्ष यामुळे मुले-मुली नितीमत्ता सोडून संस्कारहिन कार्य करण्यास प्रवृत्त होतात. आधुनिक साहित्याच्या वापरामुळे प्रत्येक वस्तू जवळ आल्यामुळे अॅड्राईड मोबाईच्या माध्यमातून अश्लील चित्रफितीच्या माध्यमातून उत्तेजना मिळालेली मुले कोवळ्या मनाच्या मुलींवर प्रेमाचे जाळे टाकून त्यांना आपल्या फासात अडकविण्याचा प्रयत्न करतात. मुलगी अडकल्यास तिचे लैंगिक शोषण करणे हेच त्यांचे लक्ष्य असल्याने त्या मुलीचे लैंगिक शोषण करून तिला वाऱ्यावर टाकले जाते. अशातूनच १५ वर्षाखालील गर्भधारणा झालेल्या २२१ मुलींचा मागील पाच वर्षात गर्भपात करण्यात आला.
सन २०११-२०१२ या वर्षात ११ मुलींचा, सन २०१२-२०१३ या वर्षात ४८ मुलींचा, सन २०१३-२०१४ या वर्षात ६२, सन २०१४-२०१५ या वर्षात ६१, तर सन २०१५-२०१६ या वर्षाच्या दहा महिन्यात ४० अविवाहित मुलींचा गर्भपात करण्यात आला.
या पाच वर्षात झालेल्या अविवाहित मुलींच्या गर्भपातावरून समाजात किती भयावह स्थिती आहे या च्या आकडेवारीवरून दिसून येते. या साठी पालकांनी जागृत होण्याची गरज आहे. शाळा महाविद्यालयातही विद्यार्थिनी व विद्यार्थ्यांचे समूपदेशन करणे आवश्यक आहे. तसेच कायद्याची कठोरता मुलांना समजावून सांगणे आवश्यक आहे. त्यामुळे अश्या घटनांना कमी करण्यास किंवा पायबंद घालण्यास मदत होऊ शकते.
सध्या प्रत्येकाच्या हाती आलेला मोबाईल आणि त्यामुळे संपर्काचे सोपे झालेले माध्यम यामुळेही मुलींच्या शोषणाचे प्रमाण वाढले असल्याचे दिसून येते.
बलात्कारातून गर्भधारणेचे १३ गर्भपात
महिलांच्या सक्षमीकरणासाठी कायदे बळकट करण्यात आले असले तरी महिलांवर अत्याचार होण्याच्या घटनांत दरवर्षी वाढ होत आहे. बलात्कारातून गर्भधारणा झालेल्या १३ मुलींनी परवानाप्राप्त गर्भपात केंद्रात गर्भपात केला. यात सन २०११-२०१२ या वर्षात ४, सन २०१२-२०१३ या वर्षात ४, सन २०१३-२०१४ या वर्षात २, सन २०१४-२०१५ या वर्षात २ व सन २०१५-२०१६ मध्ये १ मुलीने गर्भपात केला.
गर्भपात करणाऱ्या ‘त्या’ १५ महिला कोण?
गर्भपात करणाऱ्या महिलेची इत्यंभूत माहिती घेतल्याशिवाय गर्भपात करता येत नाही, असा नियम असताना सन २०११-२०१२ या वर्षात शासकीय रूग्णालयात ५ तर खासगी रूग्णालयात १० असे एकूण १५ गर्भपात करण्यात आले. परंतु हे गर्भपात कुणाचे यासंदर्भात शासकीय रूग्णालयात माहिती नाही. अनोळखी महिलांचा गर्भपात असे नमूद करण्यात आले. त्यामुळे अनोळखी महिलांचा गर्भपात कसा झाला हे शोधणे आवश्यक आहे.