कृषिपंपांचे २२०४ अर्ज ‘वेटींग’वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2020 05:00 IST2020-03-03T05:00:00+5:302020-03-03T05:00:24+5:30
जिल्ह्यातील शेतीला मागील काही वर्षांपासून निसर्गाची मार सहन करावी लागत आहे. पाऊस पाहिजे त्या प्रमाणात बरसत नसल्याने याचा शेतीवर परिणाम जाणवत आहे. एका पावसासाठी हाती आलेले पीक निसटण्याचे चित्र जिल्ह्यात बघावयास मिळते. अशात सिंचनाची मदत घेऊन आपली शेती वाचविण्याची पाळी शेतकऱ्यांवर येते. मात्र सिचंनातून पाणी घेणे म्हणजे कृषी पंपाची गरज पडते.

कृषिपंपांचे २२०४ अर्ज ‘वेटींग’वर
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : शेतीसाठी कृषी पंपांना वीज जोडणी घेण्यासाठी शेतकरी पुढे येत असून महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीकडून त्यांना वीज जोडणी दिली जात नसल्याचे दिसून येत आहे. हेच कारण आहे की, आजही जिल्ह्यातील २२०४ शेतकरी कृषीपंप जोडणीसाठी ‘वेटींग’वरच आहेत. विशेष म्हणजे, या शेतकऱ्यांनी डिमांड भरली असूनही त्यांना वीज जोडणीसाठी महावितरणच्या चकरा माराव्या लागत आहेत.
जिल्ह्यातील शेतीला मागील काही वर्षांपासून निसर्गाची मार सहन करावी लागत आहे. पाऊस पाहिजे त्या प्रमाणात बरसत नसल्याने याचा शेतीवर परिणाम जाणवत आहे. एका पावसासाठी हाती आलेले पीक निसटण्याचे चित्र जिल्ह्यात बघावयास मिळते. अशात सिंचनाची मदत घेऊन आपली शेती वाचविण्याची पाळी शेतकऱ्यांवर येते. मात्र सिचंनातून पाणी घेणे म्हणजे कृषी पंपाची गरज पडते. यामुळे शेतकरी आता पाण्याची सोय करून घेण्यासाठी पुढाकार घेत आहेत.
यासाठी शेतकरी आपल्या कृषीपंपांना अधिकृृत वीज मिळावी यासाठी वीज वितरण कंपनीकडे अर्ज करीत आहेत. केंद्र शासनाच्या उच्च दाब प्रणाली अंतर्गत शेतकºयांना वीज जोडणी द्यावयाची यासाठी जिल्ह्यातील २२१५ शेतकºयांची यादी महावितरणने ३१ मार्च २०१८ पर्यंत गोठविली आहे.
यातील १४९० अर्जांना वीज जोडणी देण्यात आली असून ७२५ अर्ज पेंडींग होते. त्यानंतर कृषीपंप जोडणीसाठी शेतकºयांचे अर्ज येत राहिले व असे २२०४ अर्ज आडघडीला ‘वेटींग’वर आहेत. वीज जोडणीसाठीची डिमांड भरूनही हे शेतकरी आपल्या नंबरची वाट बघत बसले असून त्यांना नाहक वीज कंपनीच्या कार्यालयांच्या चकरा माराव्या लागत आहेत.
आता पडणार पंपांची गरज
आता उन्हाळी शेतीची कामे सुरू असून आजही जिल्हा वरथेंबी पावसावर अवलंबून असल्यामुळे सिंचना शिवाय शेतकºयांना गत्यंतर नाही. अशात शेतकरी कृषीपंपांचा वापर करूनच शेती पिकऊ शकतात. मात्र ज्यांच्याकडे अद्याप वीज जोडणी आलेली नाही त्यांना मात्र अडचणच आहे. अशात आकडा घालून पंप चालवा हाच उपाय शेतकºयांकडे उरतो. त्यातही वीज वितरण कंपनीकडून अशा शेतकºयांवर गुन्हे दाखल केले जात असल्याने शेतकºयांची इकडे आड-तिकडे विहीर अशी स्थिती होते.