२२ गावांचे पाणी होणार बंद

By Admin | Updated: October 2, 2016 01:33 IST2016-10-02T01:33:08+5:302016-10-02T01:33:08+5:30

शासनाने ४८ गावांसाठी सुरू केलेली पाणीपुरवठा योजना बंद चालूचा खेळ खेळत आहे.

22 villages will stop drinking water | २२ गावांचे पाणी होणार बंद

२२ गावांचे पाणी होणार बंद

बिल न भरल्याचा दंड : पाणीपुरवठा योजना आर्थिक संकटात
आमगाव : शासनाने ४८ गावांसाठी सुरू केलेली पाणीपुरवठा योजना बंद चालूचा खेळ खेळत आहे. ग्राम पंचायतीच्या उदासीनतेमुळे नागरिकांचा स्वच्छ पाण्याचा हक्क हिरावल्या जात आहे. ग्राम पंचायतीनी बिलाचा भरणा न केल्यामुळे आमगाव तालुक्यातील २२ गावातील पाणी ५ आॅक्टोबरपासून बंद करण्यात येणार असल्याचे पत्र उपविभागीय अभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा यांनी खंडविकास अधिकारी आमगाव व सालेकसा यांना दिला आहे.
युती शासनाच्या काळात तयार करण्यात आलेली ४८ गावाची पाणी पुरवठा योजना आमगाव व सालेकसा तालुक्यातील लोकांसाठी वरदान ठरणारी होती. परंतु या योजनेला राबविणाऱ्या ग्राम पंचायतीमध्ये उदासीनता असल्यामुळे ही योजना अनेकदा बंद पडते. नागरिकांच्या व ग्राहकांच्या आंदोलनामुळे ही योजना पुन्हा सुरू होते. परंतु सुरू झाल्यानंतर दोन महिन्यातच बिलाचे दुखणे सुरू होते. ग्राम पंचायत मार्फत नळ कनेक्शनधारकांकडून योग्य वेळी पाणी पट्टी वसूली होत नसल्यामुळे बिल भरले जात नाही. परिणामी योजना बंद करण्याची पाळी या गावांवर येते. अनेक ग्रामपंचायती ग्राहकांकडून पैशाची वसूली करतात, परंतु वसूल केलेले पैसे योग्य वेळी भरत नसल्यामुळे पाणी पुरवठा बंद करण्याची पाणी ही योजना चालविणाऱ्या यंत्रणेवर येते. सुरूवातीला ४८ गावासाठी सुरू करण्यात आलेली ही योजना आता फक्त २७ गावांना पाणी पुरवठा करते. त्यातील २२ गावांनी बिलाचे पैसे न भरल्यामुळे त्या गावातीलही पाणी पुरवठा बंद करण्याची पाळी आली आहे. बोरकन्हार या गावावर १ लाख ४० हजार ४०० रुपये, बाम्हणी १ लाख ४२ हजार रुपये, पदमपूर २ लाख २४ हजार १०० रुपये, रिसामा ६ लाख २७ हजार ७१० रुपये, बनगाव ३ लाख २६ हजार ५०० रुपये, किंडगीपार १ लाख ३५ हजार २० रुपये, शिवनी १ लाख ५$$४ हजार ८०० रुपये, चिरचाळबांध २ लाख ११ हजार ६०० रुपये, खुर्शीपार १ लाख ८५ हजार ९२४ रुपये, जवरी ९८ हजार ४८० रुपये, मानेगाव ८७ हजार ४०० रुपये, किकरीपार ९४ हजार ८४० रुपये, कार्तुली २ लाख ४७ हजार ३६० रुपये, बंजारीटोला ५२ हजार, ननसरी ४५ हजार ३०० रुपये, सरकारटोला ७२ हजार ९८० रुपये, घाटटेमनी १ लाख ११ हजार ९९० रुपये, पानगाव १ लाख १८ हजार ६८० रुपये, सालेकसा तालुक्यातील साखरीटोला २ लाख ८९ हजार १८० रुपये, कारुटोला १ लाख ३२ हजार ६५० रुपये, सातगाव ५२ हजार ३६० रुपये तर हेटी ९८ हजार ४६० रुपये बिल थकीत असल्याने या गावांचा पाणीपुरवठा ५ आॅक्टोबरपासून बंद करण्यात येणार आहे.
अन्यथा सदर ग्रामपंचायतींना ५ आॅक्टोबरपूर्वी बिलाची रक्कम भरणे आवश्यक आहे. (तालुका प्रतिनिधी)

महिन्याकाठी लागतात ९ लाख रुपये
बनगाव प्रादेशीक पाणी पुरवठा योजना सुरू ठेवण्यासाठी प्रत्येक महिन्याला ९ लाख रुपये खर्च येतो. प्रत्येक गावाची पाणीपट्टीची वसुली ७० टक्के होणे आवश्यक आहे. तरच पाणी पुरवठा सुरळीत राहू शकतो. अन्यथा या गावांना तहानलेलेच राहावे लागणार आहे.
ग्रामसेवकांची उदासीनता
ग्राहकांकडून पाणीपट्टी वसुली करण्यासाठी ग्रामपंचायत दुर्लक्ष करीत असल्यामुळे या योजनेअंतर्गत २२ गावांचा पाणी पुरवठा बंद होणार आहे. याच योजनेतंर्गत चालणाऱ्या ९ गावांचा बिलाचा भरणा १०० टक्के करण्यात आल्यामुळे त्या गावाना हक्काची शुध्द पाणी मिळणार आहे. सरपंच व सचिवांनी हलगर्जी न करता पाणी पट्टी रक्कम जमा करावी असे आवाहन बनगाव प्रादेशिक पाणी पुरवठा कृती समितीचे संयोजक जगदिश शर्मा, राजकुमार फुंडे, विश्वनाथ मानकर, ज्योती खोटेले, रविंद्र क्षिरसागर यांनी केले आहे.

Web Title: 22 villages will stop drinking water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.