२२९ गावे ‘निर्मल गाव’ योजनेपासून दूर
By Admin | Updated: October 18, 2014 01:38 IST2014-10-18T01:38:33+5:302014-10-18T01:38:33+5:30
गावातीलच नागरिकांचे आरोग्य सुदृढ रहावे यासाठी गावातील घाण, केरकचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी महाराष्ट्र शासनाने संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान अंमलात आणले.

२२९ गावे ‘निर्मल गाव’ योजनेपासून दूर
नरेश रहिले गोंदिया
गावातीलच नागरिकांचे आरोग्य सुदृढ रहावे यासाठी गावातील घाण, केरकचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी महाराष्ट्र शासनाने संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान अंमलात आणले. गावखेड्यात गावातील रस्त्यावर मानवी विष्ठेची दुर्गंधी नेहमीच पहायला दिसत असल्यामुळे शासनाने निर्मल ग्रामची संकल्पना अंमलात आणली. या निर्मल ग्राम मोहीमेत सहा वर्षात जिल्ह्यातील ३३७ गावे निर्मल ग्राम झाली आहेत. महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीमेत अवघ्या चार वर्षात जिल्हा तंटामुक्त झाला. मात्र निर्मल ग्राम योजनेला आठ वर्षाचा काळ झाला असताना अद्याप २२९ गावे अजूनही निर्मल ग्राम योजनेपासून अलिप्त आहेत.
गोंदिया तालुक्यात एकूण १०८ ग्रामपंचायती आहेत. यातील सन २००५-०६ यावर्षात ३ गावे, सन २००६-०७ या वर्षात २४ गावे, सन २००७-०८ या वर्षात ५ गावे, सन २००८-०९ या वर्षात ४ गावे, सन २००९-१० या वर्षात ५ गावे, सन २०१०-११ या वर्षात एकही गाव निर्मल होऊ शकला नाही.
आमगाव तालुक्यात एकूण ६४ ग्रामपंचायती आहेत. यातील सन २००५-०६ यावर्षात ६ गावे, सन २००६-०७ या वर्षात २२ गावे, सन २००७-०८ या वर्षात १० गावे, सन २००८-०९ या वर्षात ४ गावे, सन २००९-१० या वर्षात ८ गावे, सन २०१०-११ या वर्षात एकही गाव निर्मल होऊ शकला नाही.
तिरोडा तालुक्यात एकूण ९५ ग्रामपंचायती आहेत. यातील सन २००५-०६ यावर्षात ६ गावे, सन २००६-०७ या वर्षात २६ गावे, सन २००७-०८ या वर्षात १५ गावे, सन २००८-०९ या वर्षात ४ गावे, सन २००९-१० या वर्षात ४ गावे, सन २०१०-११ या वर्षात एकही गाव निर्मल होऊ शकला नाही.
सालेकसा तालुक्यात एकूण ४३ ग्रामपंचायती आहेत. यातील सन २००५-०६ यावर्षात एकही गाव नाही, सन २००६-०७ या वर्षात १३ गावे, सन २००७-०८ या वर्षात ९ गावे, सन २००८-०९ या वर्षात निरंक, सन २००९-१० या वर्षात १ गावे, सन २०१०-११ या वर्षात एकही गाव निर्मल होऊ शकला नाही.
देवरी तालुक्यात एकूण ५६ ग्रामपंचायती आहेत. यातील सन २००५-०६ यावर्षात ६ गावे, सन २००६-०७ या वर्षात १७ गावे, सन २००७-०८ या वर्षात १२ गावे, सन २००८-०९ या वर्षात ३ गावे, सन २००९-१० या वर्षात ३ गावे, सन २०१०-११ या वर्षात २ गाव निर्मल झाली.
सडक/अर्जुनी तालुक्यात एकूण ६३ ग्रामपंचायती आहेत. यातील सन २००५-०६ यावर्षात ३ गावे, सन २००६-०७ या वर्षात २६ गावे, सन २००७-०८ या वर्षात १२ गावे, सन २००८-०९ , सन २००९-१०, सन २०१०-११ या तीन वर्षात एकही गाव निर्मल होऊ शकला नाही.
अर्जुनी/मोरगाव तालुक्यात एकूण ७१ ग्रामपंचायती आहेत. यातील सन २००५-०६ यावर्षात ३ गावे, सन २००६-०७ या वर्षात २१ गावे, सन २००७-०८ या वर्षात ९ गावे, सन २००८-०९ या वर्षात २ गावे, सन २००९-१० या वर्षात ५ गावे, सन २०१०-११ या वर्षात एकही गाव निर्मल होऊ शकला नाही.
गोरेगाव तालुक्यात एकूण ५६ ग्रामपंचायती आहेत. यातील सन २००५-०६ यावर्षात ४ गावे, सन २००६-०७ या वर्षात २२ गावे, सन २००७-०८ या वर्षात ८ गावे, सन २००८-०९, सन २००९-१० व सन २०१०-११ या तीन्ही वर्षात एकही गाव निर्मल नाही. जिल्ह्यातील ५५६ पैकी पहिल्या वर्षी ३१ गावे, दुसऱ्या वर्षी १७१, गावे तिसऱ्या वर्षी ८० गावे, चौथ्या वर्षी १७ गावे, पाचव्या वर्षी २६ गावे तर सहाव्या वर्षी २ गावे निर्मल ग्राम ठरली. जिल्ह्यातील २२९ गावे निर्मल ग्राम पुरस्कारापासून अलिप्त आहे.
सन २०११-१२ या वर्षात निर्मल ग्राम स्पर्धेत असलेल्या गावांचा प्रस्ताव जिल्हा परिषदेने राज्य शासनाकडे पाठविला. राज्य शासनाने निरीक्षणही केले. मात्र केंद्र शासनाने या प्रस्तावावर विचारच केला नाही. त्यामुळे सन २०११-१२ या वर्षातील पुरस्कारच घोषित केलेले नाहीत.