वीज चोरी करणाऱ्या २१६ ग्राहकांना पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2017 01:12 IST2017-04-12T01:12:08+5:302017-04-12T01:12:08+5:30
हरात मीटरमध्ये बिघाड करून व आकडे टाकून वीज चोरी करीत असल्यामुळे गोंदिया शहराच्या १३ फिडरवरची वीज गळती १८ टक्क्यापर्यंत झाली आहे.

वीज चोरी करणाऱ्या २१६ ग्राहकांना पकडले
२८ लाखांची वसुली : ११ लोकांवर गुन्हे दाखल
गोंदिया : शहरात मीटरमध्ये बिघाड करून व आकडे टाकून वीज चोरी करीत असल्यामुळे गोंदिया शहराच्या १३ फिडरवरची वीज गळती १८ टक्क्यापर्यंत झाली आहे. वीज चोरी करणाऱ्या व्यापारी, औद्योगिक व घरगुती ग्राहकांवर धाड घालून म.रा.वीज वितरण कंपनीने गेल्या आर्थिक वर्षात २१६ ग्राहकांना वीज चोरी करताना पकडले. त्यांच्याकडून दंड म्हणून २८ लाख ५७ हजार रुपये वसूल करण्यात आले.
विद्युत चोरी करूनही विद्युत वितरण कंपनीला न जुमानणाऱ्या ११ ग्राहकांवर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. गोंदिया शहरात केटीएस हॉस्पीटल, सिव्हील लाईन, टाऊन वन, टाऊन टू, टाऊन थ्री, टाऊन फोर, अर्बन इंडस्ट्रीयल, मनोहर चौक, छोटा गोंदिया, गोविंदपूर, विजय नगर, गजानन कॉलोनी व टाऊन फाईव्ह असे १३ फिडर आहेत. या फिडरवरून वीज चोरी होत असल्याने गोंदिया शहराक वीज गळतीचे प्रमाण १८ टक्के आहे. व्यापारी प्रतिष्ठाने असलेल्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वीज चोरी केली जात असल्याने या भागात कारवाई करण्यात आली. आताही कारवाई करणे सुरूच आहे. (तालुका प्रतिनिधी)
६ किमी स्वतंत्र केबल
गोंदिया शहराच्या माताटोली व रामनगर परिसरात आकडे टाकून वीज चोरी होत असलेल्या ठिकाणी वीज चोरी टाळण्यासाठी विद्युत वितरण कंपनीने स्वतंत्र केबल लावले आहे. माताटोली पररिसरात ५ किलोमीटर विहिन्यांवर तर रामनगर परिसरात ८०० मीटर परिरसरातील वाहिन्यांवर केबल बसविण्यात आले आहे.
१० लाख युनिट विद्युत चोरीची वसुली
जिल्ह्यातील औद्योगिक, वाणिज्य, घरगुती ग्राहक वीज चोरी करीत असताना त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. वीज चोरीमुळे महावितरणला होणारी हानी टाळण्यासाठी संपूर्ण विभागाने संयुक्त कारवाई करून १० लाख युनिटची वसूली करण्यात आली. वीज चोरीचे २०० प्रकरणे मार्च महिन्यात उघडकीस आणले असून त्यातून १० लाख रुपये वसूल करण्यात आले आहे.
वीज चोरीमुळे महावितरणला होणारी हाणी टाळण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे. वीज चोरीची माहिती विद्युत वितरण कंपनीच्या संबंधीत कार्यालयाला देण्यात यावी, त्यामुळे वीज चोरी करणाऱ्यावर कडक कारवाई करून एफआयआर दाखल करण्यात येईल, तसेच वीज चोरीची माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल.
- जे.एम. पारधी
मुख्य अभियंता, रामनगर गोंदिया.