पोलिसांच्या २१ साप्ताहिक रजा रद्द

By Admin | Updated: November 15, 2015 01:18 IST2015-11-15T01:18:13+5:302015-11-15T01:18:13+5:30

सण, उत्सवात किंवा निवडणुकीतही पोलिसांची साप्ताहिक रजा रद्द करण्यात आली नव्हती. कोणत्याही पोलिसांच्या साप्ताहिक रजा बंद करायचे असल्यास तसा आदेश पोलीस महासंचालक देतात.

21 weekly leave of police cancellation | पोलिसांच्या २१ साप्ताहिक रजा रद्द

पोलिसांच्या २१ साप्ताहिक रजा रद्द

दिवाळी झाली आॅन ड्युटी : ‘त्या’ दिवसांचे वेतन कोण देणार?
आमगाव : सण, उत्सवात किंवा निवडणुकीतही पोलिसांची साप्ताहिक रजा रद्द करण्यात आली नव्हती. कोणत्याही पोलिसांच्या साप्ताहिक रजा बंद करायचे असल्यास तसा आदेश पोलीस महासंचालक देतात. मात्र आमगाव पोलीस ठाण्यातील कोणत्याही कर्मचाऱ्याला दिवाळीच्या तीन दिवसात साप्ताहिक सुटी न मिळाल्याने त्यांचे एक दिवसाचे वेतन कोण देणार? असा प्रश्न पडला आहे.
कोणत्याही साप्ताहिक रजा रद्द करण्याचा आदेश पोलीस महासंचालकांकडून देण्यात येतो. त्या दिवशी ज्या पोलीस कर्मचाऱ्याची किंवा अधिकाऱ्याची साप्ताहिक रजा असेल त्यांना त्या दिवसाचा एक दिवसाचे वेतन दिले जाते. परंतु दिवाळीमध्ये पोलीस महासंचालकाचा असा कोणताही आदेश नसताना आमगावच्या उपविभागीत पोलीस अधिकारी दीपाली खन्ना यांनी आमगाव ठाण्यातील सर्व पोलीस कर्मचाऱ्यांच्या साप्ताहिक रजा रद्द केल्या होत्या.
पोलीस महांचालकांचे आदेश नसताना साप्ताहीक रजा न दिल्यामुळे वरिष्ट अधिकाऱ्यांसंदर्भात कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष ऐकीवात येत होता. दिवाळीनंतर पोलीस अधीक्षकांनी उपविभागीय अधिकारी दीपाली खन्ना यांना सुटी दिल्यामुळे लगेच दुसऱ्या दिवशी आमगाव ठाण्यातील ४२ पैकी १९ पोलीस कर्मचाऱ्यांना त्यांनी सुटी मंजूर केली. सुटीवर गेलेले कर्मचारी परतल्याशिवाय इतर कर्मचाऱ्यांना सुटी मिळणार असल्याची माहिती आहे. गेल्या अनेक वर्षात पहिल्यांदाच असा अनुभव पोलिसांना आला. त्यामुळे त्यांनी या प्रकाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. पोलिसांच्या भावनांचा विचार अधिकाऱ्यांनी करावा अशी प्रतिक्रिया उमटत आहे.

वड्याचे तेल वांग्यावर?
दिवाळीच्या सणाला उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना पोलीस अधीक्षकांनी सुटी न दिल्यामुळे त्यांनी वैतागून मला सुट्या नाही तर तुम्हाला कशी सुटी देऊ? हे धोरण ठेवल्याची चर्चा आहे. त्यातून सर्व कर्मचारी व अधिकारी यांच्या सुट्या नाकारल्या आहेत. आमगाव पोलीस ठाण्यात ४२ पोलीस कर्मचारी असून प्रत्येक दिवशी सात कर्मचाऱ्यांची साप्ताहिक सुटी येते. या तीन दिवासात २१ सुट्यांचे पैसे कोण देणार? असा प्रश्न कर्मचाऱ्यांपुढे आहे.
नाराजीत करावा लागतो बंदोबस्त
शिस्त, गस्त आणि बंदोबस्तात तत्पर राहणाऱ्या पोलिसांना सणालाही साप्ताहिक रजा मिळत नसल्याने त्यांना आपल्या कुटुंबापासून वेगळे राहून बंदोबस्त करावा लागतो. काही अधिककाऱ्यांच्या हुकूमशाही वृत्तीमुळे कर्मचारी वैतागलेले आहेत. परंतु पोलिस विभागात वरिष्ठांच्या विरोधात एक शब्द काढता येत नसला तरी त्या कर्मचाऱ्यांचा आक्रोश पानटपरीवर मात्र निश्चित फुटतो.

Web Title: 21 weekly leave of police cancellation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.