मांडोदेवी देवस्थानात २००१ ज्योतीकलश

By Admin | Updated: October 5, 2016 01:27 IST2016-10-05T01:27:18+5:302016-10-05T01:27:18+5:30

तालुक्यातील मांडोदेवी देवस्थानात यंदा २००१ ज्योतीकलशांची स्थापना करण्यात आली आहे.

2001 Jyotikchal in Mandodvi Devasthan | मांडोदेवी देवस्थानात २००१ ज्योतीकलश

मांडोदेवी देवस्थानात २००१ ज्योतीकलश

गोरेगाव : तालुक्यातील मांडोदेवी देवस्थानात यंदा २००१ ज्योतीकलशांची स्थापना करण्यात आली आहे. नवरात्रोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे.
मागील ३० वर्षांपासून येथे ज्योतीकलश स्थापित केले जात असून नवरात्रोत्सवात येथे यात्रेचे स्वरूप येते. नवरात्रोत्सवानिमित्त येथे दरवर्षीप्रमाणे महाशत चंडी यज्ञ, महाप्रसाद, आरोग्य शिबिर व समाजप्रबोधनपर कार्यकमांचे आयोजन करण्यात आले आहे. शिवाय भाविकांसाठी राहण्याची व्यवस्था भक्तनिवासात करण्यात आली आहे. भाविकांनी मोठ्या संख्येत सहभागी होण्याचे आवाहन समितीचे अध्यक्ष भय्यालाल सिंद्राम, सचिव विनोद अग्रवाल, कोषाध्यक्ष विश्वनाथ असाटी, सहसचिव कुसन घासले, सिताराम अग्रवाल, गणपतलाल अग्रवाल, सखाराम सिंद्राम, शालिकराम उईके, डॉ. जितेंद्र मेंढे आदिंनी केले आहे.

Web Title: 2001 Jyotikchal in Mandodvi Devasthan