शहरं
Join us  
Trending Stories
1
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
2
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
3
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
4
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
5
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
6
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
7
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
8
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
9
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
10
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
11
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
12
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
13
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
14
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
15
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
16
तिकडे सगळे गद्दार, नकली, भाडोत्री लोक... इकडे सगळे असली आहेत; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
17
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
18
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल
19
महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण, आमच्यासोबत आले आहेत राज ठाकरे: रामदास आठवले
20
मतदानाची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात अडचण काय? सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला सवाल

चोरी गेलेल्या २० मोटारसायकल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2019 9:47 PM

गोंदिया जिल्ह्यात मोटारसायकल चोरीचे प्रमाण वाढले आहे. मोटारसायकल चोरी करणाऱ्या टोळीच्या आठ सदस्यांकडून चोरीच्या २० मोटारसायकल जप्त करण्यात आल्या.ही कारवाई १० मार्चला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी केली.याप्रकरणात जप्त करण्यात आलेल्या मोटारसायकलची किंमत ९ लाख ६५ हजार रूपये आहे.

ठळक मुद्देएलसीबीची कारवाई : आठ जणांना अटक

लोकमत न्यूज नेटवर्क

गोंदिया : गोंदिया जिल्ह्यात मोटारसायकल चोरीचे प्रमाण वाढले आहे. मोटारसायकल चोरी करणाऱ्या टोळीच्या आठ सदस्यांकडून चोरीच्या २० मोटारसायकल जप्त करण्यात आल्या.ही कारवाई १० मार्चला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी केली.याप्रकरणात जप्त करण्यात आलेल्या मोटारसायकलची किंमत ९ लाख ६५ हजार रूपये आहे.मागील काही दिवसांपासून गोंदिया शहरासह गोंदिया जिल्ह्यात मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांत वाढ झाली आहे. मोटारसायकल चोरीच्या प्रकारावर आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक विनीता शाहू यांनी विशेष पथक स्थापन केले. गोंदिया शहरात होणाऱ्या मोटारसायकलच्या गुन्ह्यांची पार्श्वभूमी तपासून त्या गुन्हेगारांपर्यंत पोहचण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मजीतपूर परिसरात काही संशयीतांना १० मार्चला ताब्यात घेतले होते. त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेल्या चौकशीत त्यांनी रामनगरातून चोरी केलेल्या मोटारसायकलची माहिती दिली. रामनगर पोलीस ठाण्यात दाखल अपराध क्र. १६४/२०१९ चे कलम ३७९ तसेच रावणवाडी पोलीस ठाण्यात दाखल अपराध क्र.२९/२०१९ चे कलम ३७९ या दोन मोटारसायकलची माहिती दिली. याप्रकरणात आरोपींना अटक करून त्यांचा पीसीआर घेतल्यावर गोंदिया जिल्ह्यात विविध ठिकाणी चोरी केल्याचे त्यांनी सांगितले. आतापर्यंत आठ आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून ९ लाख ६५ हजार रूपये किंमतीच्या मोटारसायकल जप्त करण्यात आल्या आहे. या प्रकरणात आणखी आरोपी अडकण्याची शक्यता आहे. सदर कारवाई पोलीस अधीक्षक विनीता शाहू यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनकर ठोसरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, पोलीस उपनिरीक्षक संदीप भोपळे, पोलीस कर्मचारी गोपाल कापगते, विजय रहांगडाले, चंद्रकांत कर्पे, राजकुमार पाचे, मधुकर कृपाण, चित्तरंजन कोडापे, भुवनलाल देशमुख, भुमेश्वर जगनाडे, तुलसीदास लुटे, विनय शेंडे, नेवालाल भेलावे, चालक पोलीस शिपाई मुरली पांडे, पंकज खरबडे, विनोद गौतम, रामनगर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक अमोल सोनवने, प्रशांत माने यांनी केली.वाहन मालकांनी करावी पोलिसात तक्रारज्यांचे वाहन चोरीला गेले असेल त्या वाहन चालकांनी आपल्या वाहनासंबधी तक्रार संबधीत पोलिस ठाण्यात करावी.मिळालेल्या वाहनात त्यांचे वाहन होऊ शकते याची खात्री पोलिसांकडून करून घ्यावी. चोरीचे वाहन खरेदी करू नये किंवा वापरू नये, कुणी चोरीचे वाहन वापरत असल्यास त्याची माहिती पोलिसांना द्यावी असे पोलिसांनी कळविले आहे.मोटारसायकल चोरीत या आरोपींना केली अटक२० मोटारसायकल जप्त करून आठ आरोपींना एलसीबीने अटक केली. त्या आरोपींमध्ये शिवम संतोष खरोले (१९) रा. मजीतपूर, शुभम रमेश पटले (२०) रा. मजीतपूर, सलाम रफीक शेख (२०) रा. रेल्वे चौकीजवळ गंगाझरी, राहूल रविंद्र मस्करे (२०) रा. गंगाझरी, राकेश रामदास मडावी (२७) रा. गंगाझरी, प्रवीण उर्फ छोटू गणेश बिसेन (२५) रा.वॉर्ड नं.१ रेल्वे चौकीजवळ गंगाझरी, जितेंद्र सेवकराम साकोरे (२२) रा. मजीतपूर,गणेश प्रल्हाद मेश्राम (२०) रा. गंगाझरी यांचा समावेश आहे.

टॅग्स :ThiefचोरArrestअटक