तरूणीशी असभ्य वर्तणूक करणाऱ्यास २ वर्षांची शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:47 IST2021-02-05T07:47:12+5:302021-02-05T07:47:12+5:30
चिचगड : मुलीच्या घरात शिरून तसेच रस्त्यात अडवून तिच्याशी असभ्य वर्तणूक करणाऱ्यास देवरी येथील न्यायालयाने २ वर्षांची शिक्षा व ...

तरूणीशी असभ्य वर्तणूक करणाऱ्यास २ वर्षांची शिक्षा
चिचगड : मुलीच्या घरात शिरून तसेच रस्त्यात अडवून तिच्याशी असभ्य वर्तणूक करणाऱ्यास देवरी येथील न्यायालयाने २ वर्षांची शिक्षा व ११ हजार रूपयांचा दंड ठोठावला आहे. न्यायालयाने गुरूवारी (दि.२१) हे आदेश दिले आहेत.
प्रकरण असे की, ग्राम मोहगाव येथील पीडित मुलगी ११ मे २०१५ रोजी घरी एकटी असताना आरोपी कमलेश जीवन वालदे (रा.मोहगाव-खामखुरा) याने घराच्या मागचे दार तोडून आत प्रवेश केला होता. यावर ती दुसऱ्याच्या घरी पळून गेली होती. मात्र आरोपीने तिच्यावर पाळत ठेवली होती व ती घरी येत असताना रस्त्यात अडवून तिच्या अंगावर धावून गेला होता. प्रकरणी चिचगड पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक २४-२०१५ भादंवी कलम ४५१, ४५२, ३४१, ३५२, ५०९ अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला होता. तत्कालीन पोलीस निरीक्षक आर.पी.तिवारी यांच्या मार्गदर्शनात पोउपनि मनोहर इस्कापे यांनी तपास करुन क्रिमीनल केस क्रमांक ४३-१५ अन्वये दोषारोप न्यायप्रविष्ट केले. गुन्ह्यातील साक्षीदारांना ठाणेदार सपोनि अतुल श्रावण तवाडे व कोर्ट पैरवी पोलीस हवा ग्यानीराम कोडापे यांनी पोस्टेला बोलावून योग्यप्रकारे साक्ष देण्यास मार्गदर्शन केले. प्रकरणी प्रथम श्रेणी दंडाधिकारी देवरी शेख मोहम्मद वसीम अक्रम यांनी कलम ४५१, ३४१, ३५२ भादंवी मध्ये आरोपीला २ वर्षांची शिक्षा व ११ हजार रुपये दंड ठोठावला आहे.