शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

अंगावर वीज कोसळून २ ठार, दोन महिला गंभीर जखमी

By अंकुश गुंडावार | Updated: July 21, 2023 18:08 IST

सडक अर्जुनी, तिरोडा व देवरी तालुक्यातील घटना

गोंदिया : जिल्ह्यात तीन वेगवेगळ्या ठिकाणी वीज कोसळून २ जण ठार तर दोन मजूर महिला जखमी झाल्याची घटना शुक्रवारी (दि.२१) दुपारच्या सुमारास सडक अर्जुनी, तिरोडा व देवरी तालुक्यात घडली. ओमदास सखाराम वाघाडे रा. घाटबोरी, ता. सडक अर्जुनी व ललिता कैलास राऊत (३५) रा. शिलापूर, ता. देवरी असे वीज पडून मृत्यू झालेल्यांची नाव आहे. तर गायत्री दिनेश ठाकरे (३०), फुलन ईशू ठाकरे (३२) रा. सर्रा, ता. तिरोडा असे वीज पडून जखमी झालेल्या महिलांची नाव आहे.

जिल्ह्यात दुपारच्या सुमारास विजांच्या कडकडाटसह पावसाला सुरुवात झाली. सध्या खरीप हंगामातील रोवणीचे काम सुरु असल्याने शेतकरी आणि मजूर वर्ग शेतात असतात. सडक अर्जुनी तालुक्यातील घाटबोरी येथील ओमदास वाघाडे यांच्या शेतात शुक्रवारी रोवणीचे काम सुरु होते. दरम्यान दुपारच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. शेतात काम करीत असलेल्या ओमदास वाघाडे यांच्या अंगावर वीज कोसळली. यात त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

दुसरी घटना देवरी तालुक्यातील शिलापूर येथे घडली. शेतात रोवणीचे काम करीत असताना ललिता कैलास राऊत (३५) या मजूर महिलेच्या अंगावर वीज कोसळल्याने तिचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना दुपारच्या सुमारास घडली. तर तिसरी घटना तिरोडा तालुक्यातील सर्रा येथे घडली. शेतात रोवणीचे काम करीत असलेल्या दोन महिलांवर वीज कोसळल्याने त्या जखमी झाल्याची घटना दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली. शेतात उपस्थित शेतकऱ्यांनी या दोन्ही जखमी महिलांना वडेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. दरम्यान या दोन्ही महिलांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. दरम्यान दोन्ही घटनांची नोंद महसूल विभागाने केली आहे.

टॅग्स :AccidentअपघातRainपाऊसDeathमृत्यूgondiya-acगोंदिया