बौद्ध विवाह सोहळ्यात १९ जोडपी परिणयबद्ध
By Admin | Updated: May 4, 2017 01:10 IST2017-05-04T01:10:51+5:302017-05-04T01:10:51+5:30
भारतीय बौद्ध महासभा तालुका आमगावच्या वतीने जि.प. हायस्कूलच्या सुसज्ज पटांगणावर बौद्ध धर्मीय सामूहिक विवाह सोहळा थाटात पार पडला.

बौद्ध विवाह सोहळ्यात १९ जोडपी परिणयबद्ध
आमगाव : भारतीय बौद्ध महासभा तालुका आमगावच्या वतीने जि.प. हायस्कूलच्या सुसज्ज पटांगणावर बौद्ध धर्मीय सामूहिक विवाह सोहळा थाटात पार पडला. यात बौद्ध समाजाची १९ जोडपी परिणयबद्ध झाली.
अध्यक्षस्थानी भारतीय बौद्ध महासभा आमगावचे अध्यक्ष बलीराम खोब्रागडे होते. मार्गदर्शक म्हणून वैशाली खोब्रागडे, अधीक्षक डॉ. प्रतिभा वाघमारे होत्या. अतिथी म्हणून इंजि. के.पी. बन्सोड, डॉ. रवी सुखदेवे, विस्तार अधिकारी सुकचंद वाघमारे, अशोक डोंगरे, परमानंद मेश्राम, प्रदीप मेश्राम, आशीष अडमे, राजेश रामटेके, आर.सी. बोरकर, संचालक रामेश्वर शामकुवर, नलिनी रामटेके उपस्थित होते.
बौद्ध संस्कार विधीप्रमाणे मंगलमय सोहळा महासचिव, केंद्रीय शिक्षक तथा बोधाचार्य मीलनकुमार गजभिये यांच्या हस्ते परिणयविधी पार पडला. सोहळ्यात रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष राजेश रामटेके यांनी नवदाम्पत्यास भेटवस्तू दिल्या. तसेच डॉ. प्रतिभा वाघमारे यांनी सर्व वर-वधूंना ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ हा ग्रंथ भेट म्हणून दिला. बुद्धाचे विचार घराघरात पसरावे व बुद्धाच्या तत्वज्ञानाने मंगलमय क्रांती व्हावी या उदात्त हेतूने आपण हा ग्रंथ देत आहोत, असे विचार डॉ. प्रतिभा वाघमारे यांनी व्यक्त केले.
सामूहिक विवाह सोहळ्यामुळे एकसंघ समाजनिर्मिती होवून समाजाची आर्थिक बचत होते, असे प्रतिपादन डॉ. रवी सुखदेवे यांनी केले. तसेच बौद्ध महासभेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे कौतुक केले. सोहळ्यात तीस हजार लोकांची उपस्थिती होती.
संचालन राजेंद्र सांगोळे व प्रियंका लोणारे यांनी केले. आभार संदीप मेश्राम यांनी माानले. कार्यक्रमासाठी बेलीराम खोब्रागडे, योगेश रामटेके, सोमकांत भालेकर, भरत वाघमारे, विनोद रंगारी, सुरेश बोरकर, संदीप मेश्राम, अनिल डोंगरे, आनंद बन्सोड, राजेंंद्र बन्सोड, राजेंद्र सांगोळे, बी.एफ. बोरकर, आलोक बोरकर, शामकुवर, डॉ.मेश्राम, जितू गणवीर, चंद्रभान कोटांगले आदींनी सहकार्य केले.