सामूहिक विवाह सोहळ्यात बौद्ध समाजाची १९ जोडपी परिणयबद्ध
By Admin | Updated: April 28, 2016 01:41 IST2016-04-28T01:41:07+5:302016-04-28T01:41:07+5:30
भारतीय महासभा तालुका आमगावच्या वतीने आयोजित बौद्ध समाज सामूहिक विवाह सोहळ्यात १९ जोडपी परिणयबद्ध झाली.

सामूहिक विवाह सोहळ्यात बौद्ध समाजाची १९ जोडपी परिणयबद्ध
आमगाव : भारतीय महासभा तालुका आमगावच्या वतीने आयोजित बौद्ध समाज सामूहिक विवाह सोहळ्यात १९ जोडपी परिणयबद्ध झाली. भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष बलीराम खोब्रागडे यांच्या अध्यक्षतेखाली सदर सोहळा पार पडला.
मार्गदर्शक म्हणून तिरोड्याचे माजी आ. दिलीप बन्सोड, प्रा. उमेश नागदेवे, वैशाली खोब्रागडे उपस्थित होते. विशेष पाहुणे म्हणून जि.प. अध्यक्षा उषा मेंढे, आ. संजय पुराम, भारतीय बौद्ध महासभा गोंदियाचे जिल्हाध्यक्ष देवाराम मेश्राम, अभियंता आर.एन. रावते, पोलीस निरीक्षक भागू औटी, सुकचंद वाघमारे, व्ही.डी. मेश्राम, तेजराम चौरे, भूवन साखरे, भाऊराव वासनिक, रमेश साखरे, सरपंच सुनंदा येरणे, बी.डी.मेश्राम, रामीश्वर शामकुंवर, पं.स.सदस्य छबूताई उके, राजेश रामटेके, माजी सभापती बाबा लिल्हारे, अशोक डोंगरे, बौद्ध महासभेचे उपाध्यक्ष सोनदास गणवीर, अरविंद सूर्यवंशी, मिलन गजभिये उपस्थित होते. भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष बोधाचार्य देवाराम मेश्राम यांच्या हस्ते परिणय विधी पार पडला. बौद्ध संस्कार पद्धतीप्रमाणे विधी संपन्न झाला.
या सोहळ्यात राजेश रामटेके यांनी सर्व वरवधूंना भेटवस्तू दिल्या. सामूहिक विवाह सोहळा ही काळाची गरज आहे. यात वेळ, श्रम, पैसाची बचत होते असे आ. संजय पुराम म्हणाले. सामूहिक विवाह सोहळ्यामुळे सर्व समाज एकत्रित येतो व एक संघ समाज निर्मिती होऊन बौद्ध समाजाची आर्थिक प्रगती होते असे प्रतिपादन माजी आ. दिलीप बन्सोड यांनी केले.
बी.एस. खोब्रागडे यांनी ही मार्गदर्शन केले. प्रास्ताविक सोमकांत भालेकर, संचालन संदीप मेश्राम यांनी तर आभार राजेंद्र सांगोळे यांनी मानले.
यशस्वितेसाठी योगेश रामटेके, सुरेश बोरकर, बलीराम खोब्रागडे, भरत वाघमारे, सोमकांत भालेकर, विनोद रंगारी, संदीप मेश्राम, अनिल डोंगरे, जितू गणवीर, धनंजय रामटेके, आनंद बन्सोड, राजेंद्र बन्सोड, देवेंद्र चंद्रीकापुरे, बी.एफ. बोरकर, रामेश्वर शामकुंवर, चंद्रभान कोटांगले, राज मेश्राम, एम.झेड. नांदगावे, रविंद्र खापर्डे, कला बागडे, यांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)