कोदामेडी येथे १ लाख ८५ हजारांची अफरातफर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2017 00:31 IST2017-07-02T00:31:40+5:302017-07-02T00:31:40+5:30
सडक-अर्जुनी तालुक्यातील ग्रामपंचायत कोदामेडी येथील माजी सरपंच दामीनी ज्ञानेश्वर भिवगडे व ग्रामसेवक अरुण उईके यांनी

कोदामेडी येथे १ लाख ८५ हजारांची अफरातफर
सरपंच, सचिवाचे संगनमत : कोदामेडी ग्रामपंचायत येथील प्रकार
लोकमत न्यूज नेटवर्क
सौंदड : सडक-अर्जुनी तालुक्यातील ग्रामपंचायत कोदामेडी येथील माजी सरपंच दामीनी ज्ञानेश्वर भिवगडे व ग्रामसेवक अरुण उईके यांनी १ लाख ८५ हजार १६७ रुपयांचा घोळ केल्याचा आरोप वडेगाव येथील बाबूराव सोविंदा हुकरे यांनी केला आहे.
२०१०-११ मध्ये कोदामेडी ग्राम पंचायतला तंटामुक्त गाव समितीला मिळालेल्या पुरस्कारातून गावच्या विकासाकरीता गावामध्ये विंधन विहीरीचे खोदकाम करण्याचे काम शिवशक्ती बोअरवेल्स वडेगाव यांना देण्यात आला होता. शिवशक्ती बोअरवेल्स यांनी गावामध्ये दोन विहीरीच्या मोबदल्यात तीन विंधन विहीर (बोअरवेल्स) लावून देण्याचे ठरविले. ठरविल्याप्रमाणे संबंधीत एजेन्सी धारकाने तीन बोअरवेल्स गावामध्ये लावून दिल्या मात्र झालेल्या कामाचे पैसे आजवर शिवशक्ती बोअरवेल्स एजेन्सी धारक बाबुराव हुकरे यांना दिले नाही. सात वर्ष लोटूनही वरील तक्रारदारात पैसे मिळाले नाही. दोन दिवसा अगोदर पैश्यासाठी बोलले असता पैसे देण्यास नकर दिला. २०११ या कालावधी ग्रामसेवकाने ५ लाख रुपयाचा घोळ केला होता. पाच लाख रुपये ग्रामपंचायतीने अफरातफर केल्याची माहिती मिळाली.