१८५२ शेतकर्‍यांची वीज जोडणी प्रलंबित

By Admin | Updated: May 30, 2014 23:59 IST2014-05-30T23:59:05+5:302014-05-30T23:59:05+5:30

जिल्ह्यात विद्युत भारनियमनाने सर्वांना त्रस्त करून सोडले आहे. अनेक राजकीय पक्ष व विविध संघटना मोर्चे काढून विद्युत वितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकार्‍यांना निवेदने देत आहेत. अशातच मार्च २0१४ च्या

1852 farmers pending power connection | १८५२ शेतकर्‍यांची वीज जोडणी प्रलंबित

१८५२ शेतकर्‍यांची वीज जोडणी प्रलंबित

देवानंद शहारे - गोंदिया
जिल्ह्यात विद्युत भारनियमनाने सर्वांना त्रस्त करून सोडले आहे. अनेक राजकीय पक्ष व विविध संघटना मोर्चे काढून विद्युत वितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकार्‍यांना निवेदने देत आहेत. अशातच मार्च २0१४ च्या अखेरपर्यंत डिमांड भरूनही जिल्हाभरातील एक हजार ८५२ शेतकर्‍यांच्या कृषी पंपांच्या विद्युत जोडण्या प्रलंबित आहे. या विद्युत जोडण्या मार्च २0१५ च्या अखेरपर्यंत करण्यात येतील, असे विद्युत विभागाचे अधीक्षक अभियंता फूलकर यांनी सांगितले.
उल्लेखनिय म्हणजे १ एप्रिल २0१२ ते ३१ मार्च २0१३ या आर्थिक वर्षभरासाठी विद्युत विभागाला एक हजार ४६५ कृषी पंपांना विद्युत जोडणीसाठी विद्युत विभागाला उद्दिष्ट देण्यात आले होते. मार्च २0१३ च्या अखेरील डिमांड भरलेल्या, तसेच त्या चालू वर्षातील काही शेतकर्‍यांच्या कृषी पंपांना वीज जोडणी करून विद्युत विभागाने उद्दिष्टपूर्ती केली. विशेष म्हणजे त्यावर्षी एकूण एक हजार ७५६ शेतकर्‍यांच्या कृषी पंपांना वीज जोडणी करून विद्युत विभागाने उद्दिष्टापेक्षा अधिकची पूर्तता केली होती, असे अधीक्षक अभियंता फूलकर यांनी सांगितले.
यानंतर १ एप्रिल २0१३ ते ३१ मार्च २0१४ पर्यंत जिल्हाभरातील एकूण एक हजार ८५२ शेतकर्‍यांनी कृषी पंपाच्या विद्युत जोडणीसाठी विद्युत विभागाला अर्ज केले. विद्युत विभागाचे उद्दिष्टसुद्धा तेवढेच होते.
या सर्व शेतकर्‍यांनी वीज जोडणीसाठी विद्युत विभागाला अर्जही केलेले आहेत. त्यासाठी शेतकर्‍यांनी डिमांड रक्कमसुद्धा भरल्या आहेत. या सर्व शेतकर्‍यांच्या कृषी पंपांची वीज जोडणी मार्च २0१५ पर्यंंत करण्यात येणार आहे.
यात गोंदिया तालुक्यातील १९६, गोरेगाव तालुक्यातील १५८, तिरोडा तालुक्यातील १८८, आमगाव तालुक्यातील २३७, सालेकसा तालुक्यातील १५८, देवरी तालुक्यातील ११४, सडक/अर्जुनी तालुक्यातील ५४३ व मोरगाव/अर्जुनी तालुक्यातील २५८ शेतकर्‍यांच्या कृषी पंपांना वीज जोडण्या करण्यात येणार आहे.
 

Web Title: 1852 farmers pending power connection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.