१८ तासांचे भारनियमन
By Admin | Updated: February 20, 2015 01:19 IST2015-02-20T01:19:25+5:302015-02-20T01:19:25+5:30
येथील वीज वितरण कंपनीच्या मनमर्जी कारभारामुळे परसवाडा परिसरातील अनेक गावांमधील शेतकरी वर्ग त्रस्त झाला आहे.

१८ तासांचे भारनियमन
परसवाडा : येथील वीज वितरण कंपनीच्या मनमर्जी कारभारामुळे परसवाडा परिसरातील अनेक गावांमधील शेतकरी वर्ग त्रस्त झाला आहे. रिडींग न घेताच वीज बिल देण्याचा प्रकार घडत असताना आता १८-१८ तासांचे भारनियमन केले जात असल्यामुळे रबीच्या पिकांना पाणी देणे कठीण झाले आहे.
बाघोली, चांदोरी खुर्द, बोरा, सोनेगाव, करटी बु., करटी बु. पिपरिया, सावरा, अर्जुनी, बोंडराणी, गोंडमोहाडी, अत्री, बोदा, बिहीरीया, इंदोरा बु., किंडगीपार, परसवाडा, डब्बेटोला, महालगाव, मुरदाडा, धापेवाडा, पुजारीटोला या गावांत मोठ्या प्रमाणात रबी धानाची लागवड केली जाते. दिवसभरात १८ तास शेतकऱ्यांच्या शेतातील वीज पुरवठा बंद असतो. फक्त सहा तास विद्युत पुरवठा केला जातो. त्यामुळे धानाची नर्सरीही करपत आहे. काही शेतकऱ्यांची रोवणीही वाळली आहे.
शेतकऱ्यांनी बँकेडून पीक कर्ज घेतले. सावकाराकडून कृषी केंद्रातून खत व बियाणे उसणवारीवर आणले. मात्र महावितरणने सुरू केलेल्या भारनियमनामुळे शेतकऱ्यांवर नवीन संकट आले आहे. विद्युत विभाग रिडींग न घेता शेतकऱ्यांना जास्तीचे बिल देत असून त्यामुळे शेतकरी संकटात सापडले आहेत.
एकीकडे शासनाने निवडणुकीच्या वेळी शेतकऱ्यांना भारनियमनापासून मुक्त करू, विद्युत बिल माफ करू, अशी आश्वासने दिली होती. मात्र आता त्याच सरकारच्या काळात शेतकऱ्यांना आत्महत्येसाठी प्रोत्साहन देणारी परिस्थिती आणली जात आहे. यातून शेतकऱ्यांची कोंडी होत आहे. बँकेची कर्ज परतफेड करणे कठीण झाले आहे. शेतकऱ्यांना मुलांचे शिक्षण, लग्न ही कामे अशी करावी असे प्रश्न समोर आहे.
सात दिवसात भारनियमन बंद न झाल्यास जि.प. सदस्य डॉ.योगेंद्र भगत, रमेश पटले, रामेश्वर हरिणखेडे यांच्या मार्गदर्शनात आंदोलन करण्याचा इशारा पं.स. सदस्य रमेश पटले, सुभाष अंबुले, घनश्याम चौधरी, मज्जीत छवारे, प्रकाश अग्रवाल, मुन्ना पटले, रमेश बागळे, पंकज ठाकरे, रामप्रसाद राऊत, अरूण मिश्रा, नारायण लिल्हारे, अर्जुन लिल्हारे, मुन्ना लिल्हारे, तारा अंबुले, टेकचंद जमईवार, मनराज पटले, त्रिलोकचंद जमईवार, कवळू अंबुले, महेंद्र भगत, संदीप भगत, तारेंद्र भगत, राजु कडव, खुशाल कडव, प्रेमलाल पटले, सुरेश पटले यांनी दिला आहे. (वार्ताहर)