१७८ शाळांमध्ये तक्रारपेटीच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2019 20:36 IST2019-06-30T20:36:12+5:302019-06-30T20:36:31+5:30
विद्यार्थी आपल्या समस्या बहुतांश वेळा शिक्षकांकडे सांगू शकत नाही. कुठल्याही प्रकारच्या समस्या तोंडी सांगण्यापेक्षा लिखीत मांडणे विद्यार्थ्यांना सोईचे वाटते. यासाठी प्रत्येक शाळेत तक्रार पेटी असणे आवश्यक असताना जिल्ह्यातील १६६१ पैकी १७८ शाळांमध्ये तक्रारपेट्याच नसल्याची बाब पुढे आली आहे.

१७८ शाळांमध्ये तक्रारपेटीच नाही
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : विद्यार्थी आपल्या समस्या बहुतांश वेळा शिक्षकांकडे सांगू शकत नाही. कुठल्याही प्रकारच्या समस्या तोंडी सांगण्यापेक्षा लिखीत मांडणे विद्यार्थ्यांना सोईचे वाटते. यासाठी प्रत्येक शाळेत तक्रार पेटी असणे आवश्यक असताना जिल्ह्यातील १६६१ पैकी १७८ शाळांमध्ये तक्रारपेट्याच नसल्याची बाब पुढे आली आहे.
शाळांमध्ये तक्रारपेट्या नाहीत तर विद्यार्थी आपल्या समस्या कशा मांडणार असा प्रश्न उद्भवत आहे. आपल्या समस्या व गाºहाणी थेट शिक्षकांसमोर जाऊन सांगणे विद्यार्थ्यांना शक्य होत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या समस्या लेखी स्वरुपात सरळ मुख्याध्यापकांपर्यंत पोहोचाव्या यासाठी प्रत्येक शाळेत तक्रारपेटी ठेवणे आवश्यक आहे. परंतु जिल्ह्यातील १६६१ पैकी फक्त १४८३ शाळांमध्ये तक्रार पेट्या असून उर्वरित १७८ शाळांमध्ये तक्रारपेट्याच नाहीत.
यांतर्गत, आमगाव तालुक्यात १५४ शाळा असून १३६ शाळांमध्ये तक्रारपेट्या असून १८ शाळांमध्ये तक्रारपेट्या नाहीत. गोंदिया तालुक्यातील ४१३ शाळांपैकी २६९ शाळांमध्ये तक्रारपेट्या असून १४४ शाळांमध्ये तक्रारपेट्या नाहीत. तर सडक-अर्जुनी तालुक्यातील १७१ शाळांपैकी १५५ शाळांमध्ये तक्रारपेट्या असून १६ शाळांमध्ये तक्रारपेट्या नाहीत.
पाच तालुक्यातील सर्व शाळांमध्ये तक्रारपेट्या
अर्जुनी-मोरगाव, देवरी, गोरेगाव, सालेकसा व तिरोडा या पाचही तालुक्यातील संपूर्ण शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी तक्रारपेट्या बसविण्यात आल्या आहेत. अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील २१२, देवरी तालुक्यातील २०८, गोरेगाव तालुक्यातील १५८, सालेकसा तालुक्यातील १४३ तर तिरोडा तालुक्यातील २०२ शाळांत तक्रारपेट्या बसविण्यात आल्या आहेत.