१.७५ हजारांची दारू पकडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:45 IST2021-02-23T04:45:45+5:302021-02-23T04:45:45+5:30

गोंदिया : दवनीवाडा पोलिसांनी अवैध दारू विक्रेत्यांवर धडक कारवाई करण्याची मोहीम सुरू केली आहे. सोमवारी (दि.२२) पाच अवैध दारू ...

1.75 thousand worth of liquor was seized | १.७५ हजारांची दारू पकडली

१.७५ हजारांची दारू पकडली

गोंदिया : दवनीवाडा पोलिसांनी अवैध दारू विक्रेत्यांवर धडक कारवाई करण्याची मोहीम सुरू केली आहे. सोमवारी (दि.२२) पाच अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाई करून १ लाख ६८ हजार रुपयांचा दारू साठा जप्त केला. दवनीवाडा पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या मुरदाडा येथील सुनील मधुजी मस्करे (वय ४०) व दिनेश मधुजी मस्करे (३४) यांच्याकडून ९०० रुपये किमतीची दारू, महेन्द्र रामलाल तिवडे (३९, रा. महालगाव याच्याकडून ७२० रूपयांचा, विनोद पुरुषोत्तम नागपुरे (२१) व मनोज पुरुषोत्तम नागपुरे (१९) यांच्याकडून ६०० रुपयांचा माल, १० लिटर मोहाफुलाची दारू किंमत १ हजार रुपयाचा माल, रामकिशोर जयराम शेन्डे (४५) रा. पिपरिया याच्याकडून २० लिटर मोहाफुलाची दारू, बोंडराणी शिवारातील वैनगंगा नदी पात्रातून २४०० किलो मोहफूल किंमत १ लाख ६८ हजार रुपयांचा माल असा एकूण १ लाख ७४ हजार ९८० रुपयाचा माल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक नीलेश उरकुडे, पोलीस हवालदार देवराम खंडाते, धर्मपाल भुरे, पोलीस हवालदार राजेश पारधी, पोलीस शिपाई मोहन टेंभेकर, बुधराम डोहरे, मेंढे यांनी केली आहे.

Web Title: 1.75 thousand worth of liquor was seized