धाबेटेकडी येथून १७ हजारांची दारू जप्त ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 04:26 AM2021-04-12T04:26:31+5:302021-04-12T04:26:31+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी अवैध धंद्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिल्याने पोलीस विभाग ...

17,000 liquor seized from Dhabetekadi () | धाबेटेकडी येथून १७ हजारांची दारू जप्त ()

धाबेटेकडी येथून १७ हजारांची दारू जप्त ()

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

गोंदिया : पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी अवैध धंद्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिल्याने पोलीस विभाग कामाला लागला आहे. यातच शनिवारी (दि. १०) अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी अर्जुनी-मोरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ग्राम धाबेटेकडी येथे सर्रास अवैध दारुची विक्री करणाऱ्या दोघांना पकडले. रात्री ८ वाजता आरोपी सुभाष धनीराम डोंगरवार (३२) व कैलाश धनीराम डोंगरवार (४०, दोन्ही रा. धाबेटेकडी) यांच्या घरात व अंगणात तणसाच्या ढिगात ६०० बाटल्या देशी संत्रा दारू व विदेशी दारूच्या ११ बाटल्या असा एकूण १७ हजार १४० रूपयांचा माल जप्त करण्यात आला. याप्रकरणी आरोपींवर अर्जुनी-मोरगाव पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (ई), ७७ (अ), ८३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस नाईक ज्ञानेश्वर बोरकर करत आहेत.

Web Title: 17,000 liquor seized from Dhabetekadi ()

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.