१७ तलावांवर उद्या पुन्हा पक्षीगणना

By Admin | Updated: January 10, 2015 01:31 IST2015-01-10T01:31:13+5:302015-01-10T01:31:13+5:30

जंगल व नैसर्गिक वनसंपत्तीने नटलेल्या जिल्ह्यात देशी व विदेशी पक्ष्यांचेही वास्तव्य आहे. मात्र या पक्ष्यांची वन विभागाकडे अधिकृत नोंद नाही.

17 capsize on lake again tomorrow | १७ तलावांवर उद्या पुन्हा पक्षीगणना

१७ तलावांवर उद्या पुन्हा पक्षीगणना

गोंदिया : जंगल व नैसर्गिक वनसंपत्तीने नटलेल्या जिल्ह्यात देशी व विदेशी पक्ष्यांचेही वास्तव्य आहे. मात्र या पक्ष्यांची वन विभागाकडे अधिकृत नोंद नाही. २१ डिसेंबर रोजी जिल्ह्यातील १७ तलावांवर वनविभागाकडून पक्षीगणना करण्यात आली. आता रविवारी ११ डिसेंबरला पुन्हा पक्षीगणना होणार आहे. मात्र त्यासाठी लागणाऱ्या साहित्यांची पुर्तता अजूनही करण्यात आलेली नाही. अपुऱ्या दुर्बिणींनीच होत असलेली ही पक्षीगणना कितपत सार्थकी लागेल यावर प्रश्नचिन्ह लागले आहे.
प्रधान मुख्य वनसंरक्षक यांच्या आदेशाने वनविभागाला आता दरवर्षी अधिकृत पक्षीगणना करावी लागणार आहे. जिल्ह्यातील नवेगावबांधसह अन्य काही तलावांवर देशी व विदेशी अशा ७५ प्रजातींच्या पक्ष्यांचा वावर राहतो. जिल्ह्यात येणाऱ्या या पक्ष्यांची नोंद यापूर्वी काही पशु व पक्षीप्रेमी संघटनांकडून ठेवली जात होती. मात्र त्यात वन विभागाचे काहीच घेणे-देणे नसायचे. मात्र विदेशी पक्ष्यांचे जिल्ह्यातील आगमन, त्यात होत असलेली वाढ किंवा घट ही बाब आता वन विभागाने गांभीर्याने घेतली आहे. त्यामुळेच राज्य वन्यजीव विभागाचे प्रधान मुख्य वनसंरक्षकांनी अवघ्या राज्यात पक्षी गणना करण्याचे आदेश काढले आहेत. त्यांच्या या आदेशानुसार आता वन विभागाला दरवर्षी पक्षी गणना करणे बंधनकारक झाले आहे.
ही पक्षीगणना दोन टप्प्यात करण्याचे आदेश आहेत. त्यानुसार २१ डिसेंबरला पहिला टप्पा पूर्ण झाला. आता येत्या ११ जानेवारी रोजी दुसऱ्या टप्यात ही पक्षी गणना केली जाणार आहे. यासाठी काही सामाजिक व पशु-पक्षीपे्रमी संघटनांची मदत घेतली जाणार आहे. जिल्ह्यात यासाठी १७ तलावांची निवड करण्यात आली आहे. या तलावांवर सकाळी ६ ते ११ वाजता दरम्यान पक्षी गणना केली जाणार आहे. विशेष म्हणजे प्रत्येक पक्षी व त्यांच्या हालचाली टिपता याव्या यासाठी वन विभागाने पक्षीतज्ज्ञ व प्रेमींसाठी तलावाशेजारी पुरेपूर व्यवस्था करून ठेवली आहे. तसेच कॅमेरे व दूर्बिनसुद्धा त्यांना पुरविली जाणार आहे. काही पक्षीतज्ज्ञ व प्रेमींकडे स्वत:चे दूर्बिन असल्याचे मुख्य वन संरक्षकांनी सांगितले आहे.
पक्षीगणना करण्यासाठी वन विभागातील कर्मचाऱ्यांसह येथील सावन बहेकार, भरत जसानी, रूपेश निंबार्ते, शैलेश ठाकूर, अशोक पडोळे, आशिष वर्मा, रितेश अग्रवाल, जलाराम बुधेवार, अंकीत ठाकूर, महेंद्र राऊत, राजू खोडेचा, मुकूंद धुर्वे, दुष्यंत रेभे, अंकूर काळी, त्र्यंबक जरोदे, संजय आकरे, शाबाद खान, शशांक लाडेकर, मुनेश गौतम आदिंची उपस्थिती राहील. या गणनेतून परिपूर्ण अहवाल तयार करून प्रधान मुख्य वनसंरक्षकांना पाठविलाा जाणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: 17 capsize on lake again tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.