१.६९ लाख विद्यार्थ्यांनी घेतली शपथ
By Admin | Updated: January 26, 2016 02:35 IST2016-01-26T02:35:38+5:302016-01-26T02:35:38+5:30
गोंदिया जिल्ह्यातील १६८३ शाळांतील १ लाख ६८ हजार ७९९ विद्यार्थ्यांना तंबाखूमुक्त जीवनाची शपथ २२ व २३ जानेवारी रोजी

१.६९ लाख विद्यार्थ्यांनी घेतली शपथ
नरेश रहिले ल्ल गोंदिया
गोंदिया जिल्ह्यातील १६८३ शाळांतील १ लाख ६८ हजार ७९९ विद्यार्थ्यांना तंबाखूमुक्त जीवनाची शपथ २२ व २३ जानेवारी रोजी घेतली. यावेळी कार्यक्रमाला उपस्थित हजारोे नागरिकांनी तंबाखू, खर्रा व इतर कोमतेही व्यसन करणार नाही, अशी शपथ घेतली.
महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभाग आणि नशाबंदी मंडळ महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने गोंदियात झालेल्या राज्यस्तरीय व्यसनमुक्ती साहित्य संमेलनाच्या निमीत्ताने जिल्हाभरातील शाळांतील विद्यार्थ्यांना शपथ देण्यात आली. जि.प. व्यवस्थापनाच्या १६८३ शाळांतील १ लाख ६८ हजार ७९९ विद्यार्थ्यानी ही शपथ घेतली. शिक्षण विभागाने प्रत्येक मुख्याध्यापकावर तंबाखू सोडण्याची शपथ घेण्यात यावी अशी जबाबदारी सोपविल्याने मुख्याध्यापकांनी प्रार्थनेच्या वेळी शपथ देऊन विद्यार्थ्यानी व्यसनमुक्त राहण्याचा संकल्प केला. अनेक ठिकाणी गावकरीही उपस्थित होते.
आमगाव तालुक्यातील १५८ शाळांतील १५ हजार २७७ विद्यार्थ्यांनी शपथ घेतली. अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील २१४ शाळांतील २० हजार २४४ विद्यार्थ्यांनी शपथ घेतली. देवरी तालुक्यातील २१० शाळांतील १५ हजार १७ विद्यार्थ्यांनी शपथ घेतली. गोंदिया तालुक्यातील ४०९ शाळांतील ५६ हजार ५७३ विद्यार्थ्यांनी शपथ घेतली. गोरेगाव तालुक्यातील १६० शाळांतील १४ हजार ८२९ विद्यार्थ्यांनी शपथ घेतली. सडक-अर्जुनी तालुक्यातील १७६ शाळांतील १४ हजार ३४० विद्यार्थ्यांनी शपथ घेतली. सालेकसा तालुक्यातील १५६ शाळांतील १० हजार ६९१ विद्यार्थ्यांनी शपथ घेतली. तिरोडा तालुक्यातील २०१ शाळांतील २१ हजार ८२८ विद्यार्थ्यांनी शपथ घेतली. जिल्ह्यातील १६८४ शाळांतील एक लाख ६८ हजार ७९९ विद्यार्थ्यांनी तंबाखूमुक्त जीवनाची शपथ घेतली.
वर्षभर करणार जनजागृती
४विद्यार्थी तंबाखूपासून दूर राहावी यासाठी शिक्षण विभागाकडून प्रत्येक शाळेत जनजागृतीपर वर्षभर कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. विविध लोकांचे मार्गदर्शन आयोजित करणे, विद्यार्थ्याची खिशी तपासणे तंबाखू किंवा तंबाखूजन्य पदार्थ मिळाल्यतास त्या विद्यार्थ्याला शिक्षकांकडून योग्य मार्गदर्शन केले जाणार आहे.
प्रत्येक शाळेत २०० मीटरमध्ये बंदीचे फलक
४तंबाखू किंवा तंबाखूजन्य पदार्थ शाळेच्या आवाराच्या २०० मीटर परिसरात राहणार नाही यासंदर्भात प्रत्येक शाळेकडून फलक लावण्यात आले आहे. शाळेला लागून असलेले पानटपरी किंवा खर्राचे दुकान हटवून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी शाळेकडून प्रयत्न केले जाणार आहे. प्रत्येक शाळांनी २०० मीटरच्या आत तंबाखूबंदीचे फलक लावले किंवा नाही याची चौकशी शिक्षणविभागातील अधिकारी करणार आहेत.
अशी होती शपथ
४तंबाखू, खर्रा, धूम्रपान ह्यांच्या दुष्परिणामांची मला जाणीव आहे. म्हणून मी जन्मभर ह्या व्यसनापासून दूर राहण्याची शपथ घेत आहे. माझे घर आणि माझ्या आजूबाजूचा परिसर तंबाखूमुक्त राहावा ह्यासाठी मी प्रयत्न करीन. भारत शासनाचा तंबाखू नियंत्रण कायदा गोंदिया जिल्ह्यात लागू करण्यासाठी पुढाकार घेईन. माझी शाळा, माझे गाव आणि माझा गोंदिया जिल्हा तंबाखूमुक्त बनवील.
कोदामेडीत आज
शेतीवर विशेष ग्रामसभा
४प्रजासत्ताक दिनानिमित्त मंगळवारी २६ जानेवारीला जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीत ग्रामसभेचे आयोजन केले आहे. यावेळची ग्रामसभा खास शेतीवर आधारित होणार असून सडक अर्जुनी तालुक्यातील कोदामेडी या गावी पालकमंत्री राजकुमार बडोले, विशेष मार्गदर्शक ज्ञानेश्वर बोडखे, जिल्हाधिकारी डॉ.सूर्यवंशी, सीईओ गावडे प्रामुख्याने उपस्थित राहतील.