रस्त्यासाठी १६७ लाखांचा निधी मंजूर
By Admin | Updated: June 25, 2017 00:58 IST2017-06-25T00:58:48+5:302017-06-25T00:58:48+5:30
शहरातील कुडवा नाका त वसंत लिथो प्रेस पर्यंतच्या रस्ता रूंदीकरण, डांबरीकरण व नाली बांधकामासाठी

रस्त्यासाठी १६७ लाखांचा निधी मंजूर
रुंदीकरणाचे काम : कुडवा नाका ते लिथो प्रेस रस्ता
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : शहरातील कुडवा नाका त वसंत लिथो प्रेस पर्यंतच्या रस्ता रूंदीकरण, डांबरीकरण व नाली बांधकामासाठी मुख्यमंत्र्यांच्या विशेष निधीतून १६७ लाख रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
सदर रस्ता कॉलेज रोड म्हणूनही ओळखला जात असून पुढे कुडवा नाकाला जुळतो. त्यामुळे या रस्त्यावर नेहमीच वर्दळ असते. वर्दळीच्या तुलनेत हा रस्ता पाहिजे तेवढा रूंद नसल्याने येथे नेहमीच ट्राफीक जाम होत असून अपघातही घडत असतात. यावर आमदार गोपालदास अग्रवाल यांनी या रस्त्याच्या रूंदीकरण, डांबरीकरण व रस्त्यावर पाणी साचण्याचे प्रकार घडू नये यासाठी नाली बांधकामासाठी निधीची मागणी केली होती.
सततच्या पाठपुराव्यामुळे अखेर या रस्त्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या विशेष निधीमधून १६७ लाख रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला. तसेच आमदार अग्रवाल यांनी आपल्या कार्यालयात संबंधीत विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना रस्ता बांधकाम लवकरात लवकर करण्याचे निर्देश दिले.
त्यानुसार, सार्वजनिक बांधकाम विभाग रोहयोने निविदा प्रक्रीया पूर्ण करून उमेश असाटी नामक कंत्राटदारास कायार्रंभ आदेश दिले आहेत. लवकरच भूमापक विभागाकडून रस्त्याची मार्कींग करून रूंदीकरणाचे काम सुरू होणे अपेक्षीत आहे.