५,४८२ लाभार्थ्यांसाठी १६.१५ कोटी

By Admin | Updated: May 1, 2017 00:47 IST2017-05-01T00:47:27+5:302017-05-01T00:47:27+5:30

जिल्ह्यात पांढरे रेशन कार्डव्यतिरिक्त इतर सर्व प्रकारच्या कार्डधारक कुटुंबाच्या औषधोपचारासाठी २१ नोव्हेंबर २०१३ रोजी

16.15 crores for 5,482 beneficiaries | ५,४८२ लाभार्थ्यांसाठी १६.१५ कोटी

५,४८२ लाभार्थ्यांसाठी १६.१५ कोटी

१५,२०८ कुटुंबांची नोंदणी : राजीव गांधी जीवनदायी योजना
देवानंद शहारे   गोंदिया
जिल्ह्यात पांढरे रेशन कार्डव्यतिरिक्त इतर सर्व प्रकारच्या कार्डधारक कुटुंबाच्या औषधोपचारासाठी २१ नोव्हेंबर २०१३ रोजी राजीव गांधी जीवनदायी योजना सुरू करण्यात आली. तेव्हापासून २४ एप्रिल २०१७ पर्यंत जिल्ह्यातील सात हजार ६२९ स्वीकृत लाभार्थ्यांपैकी पाच हजार ४८२ लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेतला. त्यासाठी शासनाकडून १६ कोटी १५ लाख २५ हजार ३१५ रूपये त्यांच्या क्लेम रिपोर्टसाठी स्वीकृत केले आहे.
जिल्ह्यात केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालय, बाई गंगाबाई महिला रूग्णालय, सेंट्रल हास्पिटल, गोंदिया केअर हॉस्पिटल व न्यू गोंदिया हॉस्पिटलमध्ये सदर योजनेंतर्गत रूग्णांच्या उपचाराची सोय करून देण्यात आली आहे. सध्या सेंट्रल हॉस्पिटलला यातून वगळण्यात आल्याची माहिती आहे. योजनेच्या सुरूवातीपासून जिल्ह्यात सात हजार ६३९ क्लेम रिपोर्ट स्वीकृत करण्यात आले. यापैकी ३३० अस्वीकृत, ४१ प्रलंबित ९०५ रद्द करण्यात आले. तर पाच हजार ८२ प्रकरणे मंजूर करण्यात आले. त्यासाठी १६ कोटी १५ लाख २५ हजार ३१५ रूपये मंजूर करण्यात आले.
जिल्ह्यातील पाच हजार ४८२ लाभार्थ्यांपैकी जिल्हा रूग्णालयांतर्गत तीन हजार ७२ लाभार्थ्यांसाठी पाच कोटी ३३ लाख ४१ हजार ९०० रूपये स्वीकृत करण्यात आले. यात बाई गंगाबाई महिला रूग्णालयात ८६८ लाभार्थ्यांसाठी एक कोटी २१ लाख ४९ हजार रूपये, सेंट्रल हॉस्पिटलमध्ये ११७ लाभार्थ्यांसाठी २२ लाख ३३ हजार रूपये, गोंदिया केअर हॉस्पिटलमध्ये ११६ लाभार्थ्यांसाठी ४२ लाख ४९ हजार रूपये, केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालयात एक हजार २४० लाभार्थ्यांसाठी दोन कोटी २० लाख चार हजार ५०० रूपये व न्यू गोंदिया हॉस्पिटलमध्ये ७३१ लाभार्थ्यांसाठी एक कोटी २७ लाख सहा हजार ४०० रूपये स्वीकृत करण्यात आले आहेत.
जिल्ह्यात राजीव गांधी जीवनदायी योजनेंतर्गत एकूण १५ हजार २०८ कुटुंबांची नोंदणी करण्यात आली असून यात एकूण ४५ हजार ३१६ लाभार्थी कुटुंब सदस्यांचा समावेश आहे. तर काही कागदपत्रांअभावी ९३६ कुटुंबांची नोंदणी अस्वीकृत करण्यात आली असून त्यात दोन हजार २१८ अस्वीकृत लाभार्थ्यांचा समावेश आहे.

Web Title: 16.15 crores for 5,482 beneficiaries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.