श्री पद्धतीचे होणार १६ हजार प्रात्यक्षिक

By Admin | Updated: January 5, 2015 23:05 IST2015-01-05T23:05:46+5:302015-01-05T23:05:46+5:30

जिल्ह्यात उन्हाळी भात लागवड करिता शेतकऱ्यांची लगबग सुर झाली आहे. शेतकरी आपल्या व्यस्त असतानाच कृषी विभाग सुद्धा शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सज्ज झाला आहे.

16,000 demonstration will take place in Shri Prabhupada | श्री पद्धतीचे होणार १६ हजार प्रात्यक्षिक

श्री पद्धतीचे होणार १६ हजार प्रात्यक्षिक

गोंदिया : जिल्ह्यात उन्हाळी भात लागवड करिता शेतकऱ्यांची लगबग सुर झाली आहे. शेतकरी आपल्या व्यस्त असतानाच कृषी विभाग सुद्धा शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सज्ज झाला आहे. यामुळेच जिल्ह्यात यंदा उन्हाळी भात पिक लागवडींतर्गत श्री पद्धतीचे १६ हजार २५० प्रात्यक्षिक घेतले जाणार आहे. विशेष म्हणजे कृषी विभागाने यासाठी तालुकानिहाय क्षेत्र निश्चीत केले असून त्यात अर्जुनी मोरगाव तालुक्यात सर्वाधीक पाच हजार प्रात्यक्षिक घेतले जाणार असल्याची माहिती आहे.
गोंदिया जिल्ह्याची धानाचे कोठार म्हणून ओळख आहे. धान पिक हेच येथील शेतकऱ्यांचे मुख्य पिक असून धानाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. मात्र आजही यात जुन्याच पद्धती व तंत्रज्ञानाचा उपयोग होत असल्याचे दिसून येत. त्यामुळे पाहिजे तसे उत्पादन होत नसून याचा शेतकऱ्यांनाही फटका बसतो. अशात नवनवीन तंत्रज्ञानांचा वापर करून शेतकऱ्यांनी आपले उत्पादन व आर्थिक उत्पन्न वाढवून घ्यावे यासाठी कृषी विभागाकडून सातत्याने शेतकऱ्यांसाठी नवनवीन प्रयोग करून त्यांना सुविधा पुरविली जाते. यांतर्गत यंदा राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत श्री पद्धतीचे जिल्ह्यात १६ हजार २५० प्रात्यक्षिक घेतले जाणार आहेत. शेतकऱ्यांना प्रोत्साहीत करून त्यांचा श्री पद्धतीकडे कल वाढावा यासाठी ही योजना राबविली जाते. (शहर प्रतिनिधी)

Web Title: 16,000 demonstration will take place in Shri Prabhupada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.