१.६० कोटींचा बांबू आगारात धुळखात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2020 05:00 IST2020-12-18T05:00:00+5:302020-12-18T05:00:24+5:30
तालुक्यातील दरेकसा परिसरात बंजारी, मुरकुटडोह, दंडारी, टेकाटोला, दलदलकुही व त्या लगतच्या परिसरात मोठ्या प्रमाणात दर्जेदार बांबूचे उत्पादन वन विकास महामंडळाले मिळते. जानकारांच्या मते तालुक्यातील बांबू मजबूत, दर्जेदार व बहुपयोगी स्वरुपाचे आहे. या बांबूद्वारे अनेक प्रकारच्या वस्तूंची निर्मिती करीत विविध क्षेत्रात कामात आणला जातो. तालुक्यातील बांबूला फळबाग, शेती करणाऱ्या क्षेत्रात सर्वात जास्त मागणी असते.

१.६० कोटींचा बांबू आगारात धुळखात
विजय मानकर
लोकमत न्यूज नेटवर्क
सालेकसा : मागील वर्षात एकीकडे सालेकसा तालुक्यात बांबूचे विक्रमी उत्पादन लाभले असून दुसरीकडे कोरोनाचा संकटकाळ आला. त्यामुळे एकूण ७ लाख बांबूपैकी ३ लाख बांबू लिलावाद्वारे विक्री झाले तर एक कोटी ६० लाख रूपये किंमतीचे बांबू मागील ७ महिन्यांपासून एफडीसीएमच्या लाकूड आगारात धूळ खात पडलेले आहे. यंदा जर वेळेपूर्वी बांबू लिलाव होऊ शकला नाही तर कोट्यवधी रुपयांची वनसंपदा वाया जाण्याची वेळ येवू शकते.
तालुक्यातील दरेकसा परिसरात बंजारी, मुरकुटडोह, दंडारी, टेकाटोला, दलदलकुही व त्या लगतच्या परिसरात मोठ्या प्रमाणात दर्जेदार बांबूचे उत्पादन वन विकास महामंडळाले मिळते. जानकारांच्या मते तालुक्यातील बांबू मजबूत, दर्जेदार व बहुपयोगी स्वरुपाचे आहे. या बांबूद्वारे अनेक प्रकारच्या वस्तूंची निर्मिती करीत विविध क्षेत्रात कामात आणला जातो. तालुक्यातील बांबूला फळबाग, शेती करणाऱ्या क्षेत्रात सर्वात जास्त मागणी असते. यात महाराष्ट्राच्या नाशिक विभागात फळबाग, शेतीमध्ये मजबूत रठ बांबूचा उपयोग विविध कामांसाठी केला जातो. या शिवाय या तालुक्यातील बांबूपासून टोपले, परडे यांच्यासह गृह सजावट व शोभवंत वस्तू तयार करण्यासाठी सुद्धा मोठी मागणी आहे. त्यामुळे दरवर्षी तालुक्यातील जंगलातून प्राप्त बांबू लवकर लिलाव केला जातो व याचा नफा एफडीसीएम आणि महाराष्ट्र शासनाला मिळतो. तालुक्यात वेगवेगळ्या जंगलातून किमान तीन लाखाच्यावार उत्तम प्रतीचा बांबू वेगवेगळ्या बांबू कूप मधून प्राप्त होते. जवळ पास दोन हजार हेक्टर वन क्षेत्रात बांबूचे संरक्षण व संवर्धन केले जाते. एका कूपमधील बांबूचा संवर्धन तीन वर्षापर्यंत केला जातो. या तीन वर्षात बांबू पूर्ण विकसित होवून ....
उपयोग करण्यासाठी परिपक्च झालेला असतो. त्यानुसार वनविकास महामंडळच्यावतीने दर ३ वर्षात एका कूप मधील तर दुसऱ्या वर्षी दुसऱ्या कूप मधील ३ वर्ष पूर्ण झालेला बांबू कापला जातो. हा क्रम दरवर्षी नित्य चालत असून तालुक्यात सरासरी ३ लाखांच्यावर बांबू प्रत्येक वर्षी कापला जातो. सन २०१९-२० वर्षात निषर्गाची कृपा दृष्टी तालुक्यावर जास्त झाली असून ७ लाखांवर विक्रमी बांबू प्राप्त झाला. बांबू लिलाव होताना एका बांबूला किमान ४० रु. एवढी किंमत होते. त्यानुसार मागील वर्षात दोन कोटी ८० लाख रुपयांचे बाबू उत्पादन लाभले. त्यापैकी एक कोटी २० लाख रुपयांचे ३ लाख बांबू लिलाव व आणखी लिलावाची शक्यता असताना कोरोना संकट वाढल्यामुळे लिलाव होऊ शकला नाही. यामुळे ४ लाख बांबू आजही आगारात पडले असून हा एक कोटी ६० लाख रुपयांचा बांबू आजही लिलावाच्या प्रतिक्षेत पडून आहे.
गोंदियात सर्वात चांगल्या प्रतीचा दर्जेदार बांबू दरेकसा परिसरातच प्राप्त होत असून या बांबूला लिलावात प्रथम पसंती दिली जाते. त्यामुळे शिल्लक असलेला बांबू येत्या दिवसात लिलाव करून विक्री होऊ शकतो.
-एस.एच. पिंजारी, वन परिक्षेत्र अधिकारी, एफडीसीएम, सालेकसा