१६ झाले बरे १४ नवीन रुग्णांची पडली भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:28 IST2021-03-06T04:28:29+5:302021-03-06T04:28:29+5:30
गोंदिया : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग आटोक्यात असला तरी गोंदिया तालुक्यातील कोरोना बाधितांचा आलेख सातत्याने उंचावत आहे. तर कोरोनामुक्त असलेल्या ...

१६ झाले बरे १४ नवीन रुग्णांची पडली भर
गोंदिया : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग आटोक्यात असला तरी गोंदिया तालुक्यातील कोरोना बाधितांचा आलेख सातत्याने उंचावत आहे. तर कोरोनामुक्त असलेल्या तालुक्यांमध्ये कोरोनाची पुन्हा एंट्री झाली आहे. मात्र रुग्ण संख्या बऱ्यापैकी आटोक्यात आहे. पण नागरिकांनी अधिक काळजी घेतल्यास कोरोनाला जिल्ह्यातून हद्दपार करण्यास मदत होऊ शकते. जिल्ह्यात शुक्रवारी (दि.५) १४ बाधितांची नोंद झाली तर १६ बाधितांनी कोरोनावर मात केली.
जिल्ह्यात शुक्रवारी आढळलेल्या १४ कोरोना बाधितांमध्ये सर्वाधिक १० रुग्ण गोंदिया तालुक्यातील आहेत. तिरोडा १, गोरेगाव १, आमगाव तालुक्यातील २ बाधितांचा समावेश आहे. जिल्ह्यात सर्वाधिक कोरोना बाधितांची संख्या ही गोंदिया तालुक्यात आहे. त्यामुळे गोंदिया शहर आणि तालुकावासीयांतून थोडी अधिक काळजी घेण्याची गरज आहे. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने जिल्ह्यात आतापर्यंत ७२,५०२ जणांचे स्वॅब नमुने तपासणी करण्यात आले. त्यापैकी ६०,६०८ नमुने निगेटिव्ह आले आहे. कोरोना बाधितांचा त्वरित शोध घेण्यासाठी रॅपिड अँटीजेन टेस्ट केली जात आहे. या अंतर्गत ६९,४०१ जणांची चाचणी करण्यात आली. त्यापैकी ६३,१८० नमुने निगेटिव्ह आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १४,५१४ कोराेना बाधित आढळले असून यापैकी १४,१६५ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर ७४ स्वॅब नमुन्याचा अहवाल गोंदिया येथील प्रयोगशाळेकडून प्राप्त व्हायचा आहे.