जिल्ह्यात १६ रुग्णांची कोरोनावर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:49 IST2021-02-05T07:49:45+5:302021-02-05T07:49:45+5:30
गोंदिया : तब्बल ९ महिन्यांच्या कालावधीनंतर जिल्ह्यात एकही बाधित रुग्ण आढळून आलेला नसतानाच १६ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याचे दिलासादायक ...

जिल्ह्यात १६ रुग्णांची कोरोनावर मात
गोंदिया : तब्बल ९ महिन्यांच्या कालावधीनंतर जिल्ह्यात एकही बाधित रुग्ण आढळून आलेला नसतानाच १६ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याचे दिलासादायक चित्र दिसून आले आहे. यामुळे आता जिल्ह्यातील बाधितांची संख्या १४,१७५ एवढी झाली असून यातील १३,८६५ रुग्णांनी कोरोनावर मात केल्यानंतर आता जिल्ह्यात १२८ रुग्ण क्रियाशील आहेत. यावरून आता जिल्हा लवकरच कोरोनामुक्त होणार असल्याचे म्हणणे वावगे ठरणार नाही.
जिल्ह्यात शुक्रवारी (दि. २९) कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांमध्ये गोंदिया तालुक्यातील ११, आमगाव २, सालेकसा १, देवरी १ तर सडक-अर्जुनी तालुक्यातील १ रुग्ण आहे. यानंतर आता क्रियाशील असलेल्या १२८ रुग्णांमध्ये गोंदिया तालुक्यातील ७९, तिरोडा ७, गोरेगाव ७, आमगाव १३, सालेकसा ९, देवरी ५, सडक-अर्जुनी २ तर अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील ४ तर इतर राज्य व जिल्ह्यातील २ रुग्ण आहेत. विशेष म्हणजे, क्रियाशील असलेल्या या रुग्णांमधील ६५ रुग्ण घरीच अलगीकरणात असून यात, गोंदिया तालुक्यातील ४१, तिरोडा ३, गोरेगाव ४, आमगाव ६, सालेकसा ५, देवरी ३, सडक-अर्जुनी १ तर अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील २ रुग्ण आहेत. यानंतर आता जिल्ह्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.९० टक्के असून मृत्यू दर १.२० टक्के नोंदविण्यात आला आहे. तर व्दिगुणीत गती दर २२६.४ दिवस नोंदविण्यात आला आहे. विशेष म्हणजे, राज्य व देशातील दरांपेक्षा जिल्ह्यातील स्थिती अधिक चांगली असल्याचे दिसून येत आहे.
----------------------------------
जिल्ह्यात १,३०,१४६ चाचण्या
जिल्ह्यात आतापर्यंत १,३०,१४६ कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये ६५,००१ आरटी-पीसीआर चाचण्या असून यात ८,३७१ पॉझिटिव्ह तर ५३,३७३ चाचण्या निगेटिव्ह आल्या आहेत. तसेच ६५,१४५ रॅपिड ॲंटिजन चाचण्या असून यातील ६,०९५ पॉझिटिव्ह तर ५९,०५० चाचण्या निगेटिव्ह आल्या आहेत.