शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेशी जायला आता कर लागणार? खुद्द PM मोदींनी Fact Check केले; म्हणाले, “सत्याचा लवलेश नाही”
2
‘एक्स्प्रेस वे’ची कोंडी रात्री कायम, पुण्याहून मुंबईत येणारी वाहतूक हलेना; ‘मिसिंग लिंक’चे काय?
3
१५ राज्यांना ११ तास महत्त्वाचे, मोठे वादळ, गडगडाटासह पावसाचा इशारा; महाराष्ट्रात काय होणार?
4
इराणची पुन्हा भारताला साद; परराष्ट्र मंत्री म्हणाले, “शांततेसाठी भूमिका घ्यावी, स्वागत करू”
5
PM मोदींची २ तासांची 'पावर व्हिजिट'! चालता चालता UAE सोबत ४७९६२०७५०००० ची डील केली!; भारताचं तेल-गॅस संकट कायमचं मिटणार?
6
होर्मुझ तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताचा मोठा निर्णय, थेट ओमान-UAE पर्यंत अंथरणार 'पाइपलाइन'; किती खर्च येणार? 
7
“८ महिने झाले तरी GR काढला नाही”; पुन्हा आंदोलनाची हाक, मनोज जरांगे पाटील तारीख जाहीर करणार
8
भोजशाळा हे सरस्वती मंदिरच! मध्य प्रदेश हायकोर्टाच्या निकालावर असदुद्दीन ओवैसी काय म्हणाले? बाबरी प्रकरणाशी जोडला संबंध
9
खळबळजनक! टरबूज खाल्ल्याने वडिलांचा मृत्यू, मुलाची प्रकृती चिंताजनक; श्योपूरमधील धक्कादायक घटना
10
पाकिस्तानची लाज निघाली..!! आधी बांगलादेशकडून हरले, त्यात आता WTCचे गुण कमी झाले, काय घडलं?
11
PM मोदींच्या आवाहनानंतर सुप्रीम कोर्टाचाही मोठा निर्णय! आता 'मीलॉर्ड'देखील 'WFH'सह करणार 'कार पूलिंग'
12
अधिक मास शनि नक्षत्र गोचर २०२६: ८ राशींना वरदान काळ, चौफेर चौपट लाभ; भरघोस भरभराट, शुभ घडेल!
13
बेरोजगारांची झुरळाशी तुलना; CJI म्हणाले, “सोशल मीडिया-RTI कार्यकर्ते बनून यंत्रणा कुरतडतात”
14
STचे तिकीट वाढणार? १२५ कोटींचा भार, डिझेल दरवाढीचा फटका; प्रताप सरनाईकांचे मोठे संकेत
15
शनि नक्षत्र गोचर २०२६: ५ राशींनी ५ उपाय अवश्य करा, शनि देईल लाभच लाभ; अधिक मास ठरेल खास!
16
सूर्य वृषभ संक्रांती २०२६: ७ राशींना यश-प्रगती, नफा-फायदा; १ उपाय करा, १ महिना चांगला लाभ!
17
Top Marathi News LIVE: नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला ६ दिवसांची सीबीआय कोठडी
18
कोकणातील काजू आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा मुंबईत धडक मोर्चा, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
19
शासनाचे काम लोकाभिमुख, गतिमान आणि पारदर्शक; मुंबईतील लाभार्थ्यांना विविध लाभांचे वितरण
20
ट्रम्प-जिनपिंग भेटीवर रशियाची पहिली प्रतिक्रिया! 'त्या' ४० तासांच्या चर्चेत नेमकं काय घडलं? पुतिन लवकरच चीनला जाणार
Daily Top 2Weekly Top 5

१५ गावातील पाणी टंचाई झाली दूर

By admin | Updated: May 10, 2014 00:20 IST

गेल्या १० आॅक्टोबर २०१३ पासून तर ३१ मार्चपर्यंत अर्जुनी मोरगाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजना बंद होती. यामुळे १५ गावातील पाणी पुरवठा ठप्प झाला होता.

गोठणगाव : गेल्या १० आॅक्टोबर २०१३ पासून तर ३१ मार्चपर्यंत अर्जुनी मोरगाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजना बंद होती. यामुळे १५ गावातील पाणी पुरवठा ठप्प झाला होता. पण ऐन उन्हाळ्यात आता ही योजना सुरळीत सुरू असल्यामुळे गावकर्‍यांची पाणी टंचाईची समस्या मोठ्या प्रमाणात दूर झाली आहे. अर्जुनी मोरगाव तालुक्यातील खांबी आणि शिरेगावबांध येथील पाणी पुरवठा योजना आधीपासून सुरळीत होत्या. मात्र रामपुरी आणि अर्जुनी मोरगाव या योजना बंद होत्या. त्यापैकी रामपूरी येथील पाणी पुरवठा योजना मार्चपासून सुरू झाली. मात्र वीज बिलाची मोठी रक्कम थकित असल्यामुळे पाच महिने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. अर्जुनी/मोरगाव प्रादेशिक पाणी पुरवठा मंडळातर्गंत तालुक्यातील एकूण १५ गावांना शुध्द पिण्याचा पुरवठा केला जातो. मात्र विद्युत बील जास्त झाल्यामुळे महावितरण कंपनीने वीज पुरवठा खंडित केला होता. गावातील समितीने पाठपुरावा केला. खांबी, चिरेगावबांध आणि अर्जुनी मोरगाव प्रादेशिक पाणी पुरवठा मंडळाच्या पदाधिकार्‍यांनी उपोषण सुरू केले होते. आ.राजकुमार बडोले यांनीही भेट देऊन उपोषण मागे घेण्यास सांगितले. पण तरीही प्रशासनाकडून प्रतिसाद मिळत नसल्यामुळे नंतर आ.बडोले यांनीही आंदोलनात्मक पवित्रा घेतला. त्यानंतर जि.प.सीईओंनी जिल्हा परिषदेच्या फंडातून ८ लाख ३७ हजार रुपयांची व्यवस्था करून थकित वीज बिल भरण्याची सोय करून दिली. अखेर भर उन्हाळ्यात पाण्याची सोय झाल्यामुळे नागरिकांचा जीव भांड्यात पडला. पाणी पुरवठा बंद असता तर १५ गावांमधील नागरिकांना उन्हात पाच कि. मी. अंतरावर भटकंती करावी लागत होती. महाराष्टÑ जीवन प्राधिकरण शहरी व ग्रामीण योेजनेतर्गंत गोठणगावला इटियाडोह धरणाचे पाणी शुध्दीकरण करुन पाणी पुरवठा करण्याकरिता १९ गावांसाठी पाणी पुरवठा योजना तयार करण्यात आली होती. यानंतर सदर योजनेचे हस्तांतरण ८ सप्टेबंर २०१२ पासून अर्जुनी/मोरगाव प्रादेशिक पाणी पुरवठा मंडळाकडे करण्यात आले. या योजनेच्या हस्तांतरणा दरम्यान प्रादेशिक पाणी पुरवठा मंडळाने योजनेतील बर्‍याच त्रृटी महाराष्टÑ जीवन प्राधिकरण विभागाच्या अधिकार्‍यांसमोर ठेवल्या होत्या. यामध्ये इटियाडोह येथे बांधण्यात आलेल्या विहिरीवर जी पाईप लाईन टाकण्यात आली आहे. ती सदोष पूर्ण असून यापैकी बरेच पाईप मातीत दबले असल्याने अनेकदा पाणी पुरवठ्यात अडचण निर्माण होत असते. तसेच एखाद्या ठिकाणी पाईप लाईन लिकेज असल्यास पाईपचा शोध घेण्यास देखील बराच त्रास सहन करावा लागतो. योजनेच्या हस्तांरणाच्या वेळी कालवा तयार करण्याची देखील मागणी करण्यात आली होती. मात्र तेव्हा महाराष्टÑ जीवन प्राधिकरण विभागाच्या अधिकार्‍यांनी या समस्यांकडे दुलर्क्ष केले. ही योजना आता जिल्हा परिषदेकडे हस्तांतरित करण्यात यावी अशी मागणी जोर धरत आहे.