गोंदियातून जाणाऱ्या १५ रेल्वेगाड्या रद्द

By Admin | Updated: June 28, 2015 01:11 IST2015-06-28T01:11:30+5:302015-06-28T01:11:30+5:30

पश्चिम मध्य रेल्वेच्या इटारसी आरआरआय कॅबिनला (रूट रिले इंटिरलॉकिंग) आग लागल्यामुळे

15 trains going through Gondia cancellation | गोंदियातून जाणाऱ्या १५ रेल्वेगाड्या रद्द

गोंदियातून जाणाऱ्या १५ रेल्वेगाड्या रद्द

तारांबळ : रेल्वे प्रवास तीन दिवसांपासून झाला विस्कळीत
गोंदिया : पश्चिम मध्य रेल्वेच्या इटारसी आरआरआय कॅबिनला (रूट रिले इंटिरलॉकिंग) आग लागल्यामुळे व भोपाल मंडळात नॉन-इंटरलॉकिंगचे कार्य सुरू असल्यामुळे दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेशी संबंधित १५ प्रवासी गाड्या रद्द तर दोन गाड्यांचे मार्ग परिवर्तन करण्यात आले आहे.
आरआरआय कॅबिनमधून रेल्वे गाड्यांचे मार्ग परिवर्तन, संचालन आदी बाबी होतात. आरआरआय कॅबीनमध्ये सुधारणा होईपर्यंत या गाड्या २८ जूनपर्यंत प्रभावित राहणार आहेत.
२४ जून रोजी बिलासपूर रोजी बिलासपूरवरून सुटणारी बिलासपूर-अमृतसर छत्तीसगड एक्स्प्रेस (१८२३७) रद्द करण्यात आली होती. तर अमृतसरवरून सुटणारी अमृतसर-बिलासपूर छत्तीसगड एक्सप्रेस (१८२३३८) २४ व २७ जूनसाठी रद्द करण्यात आल्या आहेत. २४, २५, २६, २७ व २८ जून रोजी बिलासपूरवरून सुटणारी बिलासपूर-इंदूर नर्मदा एक्सप्रेस (१८२३४) व इंदोरवरून सुटणारी इंदोर-बिलासपूर नर्मदा एक्सप्रेस (१८२३३), छिंदवाडावरून सुटणारी छिंदवाडा-इंदोर पंचवेली पॅसेंजर (५९३८६) व इंदोरवरून सुटणारी इंदोर-छिंदवाडा पंचवेली पॅसेंजर (५९३८६) या गाड्यांचा प्रवास रद्द करण्यात आला.
२५ व २७ जून रोजी छिंदवाडावरून सुटणारी छिंदवाडा-दिल्ली सराय रोहिल्ला पातालकोट एक्सप्रेस (१४००९) व २४, २६ व २८ जून रोजी दिल्ली सराय रोहिल्लावरून सुटणारी (१४०१०) दिल्ली सराय रोहिल्ला-छिंदवाडा पातालकोट एक्सप्रेस रद्द करण्यात आल्या. २५ जून रोजी बिलासपूरवरून सुटणारी (०८२४५) बिलासपूर-बिकानेर व २७ जून रोजी बिकानेरवरून सुटणारी (०८२४६) बिकानेर-बिलासपूर एक्सप्रेस रद्द करण्यात आल्या.
२७ जून रोजी भगत की कोठीवरून सुटणारी (०८२४४) भगत की कोठी-बिलासपूर एक्सप्रेस रद्द, २५ व २७ जून रोजी निजामुद्दीनवरून सुटणारी (१२८०८) निजामुद्दीन-विशाखापट्टनम समता एक्सप्रेस तसेच २५ व २८ जून रोजी विशाखापट्टणमवरून सुटणारी (१२८०७) विशाखापट्टणम-निजामुद्दीन समता एक्सप्रेस या गाड्यांचा प्रवास रद्द करण्यात आला आहे. या गाड्यांचा प्रवास रद्द झाल्याने गोंदिया रेल्वे स्थानकावरून प्रवास करणाऱ्यांची एकच तारांबळ उडत आहे.(प्रतिनिधी)
दोन गाड्यांचे मार्ग परिवर्तन
२८ जूनपर्यंत दुर्गवरून सुटणारी (१२८५३) दुर्ग-भोपाल अमरकंटक एक्स्प्रेसचा मार्ग परिवर्तन करण्यात आला आहे. ही गाडी आता बिलासपूर-शहडोल-न्यू कटनी-कटनी मुरवाडा- बीना या मार्गाने धावत आहे. तर २४ ते २८ जूनपर्यंत भोपाळवरून सुटणारी (१२८५४) भोपाल-दुर्ग अमरकंटक एक्स्प्रेस आता बीना-कटनी मुरवाडा-न्यू कटनी-शहडोल-बिलासपूर या मार्गाने धावत आहे.

Web Title: 15 trains going through Gondia cancellation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.