शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांची सरकारमधून बाहेर पडण्याची तयारी?; 'वर्षा'वरील बैठकीत दादा संतापले, दानवेंचा दावा
2
डॉ. मुजम्मिलच्या डायरीतून समोर आलं मोठं गुपित, 'कोड वर्ड'मध्ये लिहिला होता दहशतीचा प्लॅन! आणखी 25 नावं समोर
3
पार्थ पवारांच्या कंपनीला सूट द्यायची आहे का? बावनकुळेंच्या प्रश्नामुळे मुद्रांक शुल्क विभागच संभ्रमात
4
CM देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे एकाच मंचावर येणार; दोघांची भेट लक्षवेधी ठरणार
5
तहसीलदार पदावरून ४ वेळा निलंबन; ‘कामाची’ सवय असलेले सूर्यकांत येवले लाच प्रकरणांतही आघाडीवर
6
दिल्लीत स्फोटापूर्वी मशिदीत गेला होता दहशतवादी डॉ. उमर नबी; स्फोटाच्या आधीचे सीसीटीव्ही समोर
7
अल-कायदाचा माजी कमांडर; व्हाईट हाऊसमध्ये अल-शरा आणि डोनाल्ड ट्रम्प यांची ऐतिहासिक भेट
8
“बूट फेकीसारख्या घटना पुन्हा घडू नये यासाठी काय उपाय करता येईल?”; सुप्रीम कोर्टाचा सवाल
9
कर्तव्यनिष्ठेला सलाम! कुशीत बाळ अन् हातात मशीन... आई करतेय कंडक्टरचं काम; 'ती'चा संघर्ष
10
'या' सरकारी बँकेचा ग्राहकांना मोठा दिलासा; घर घेण्याच्या विचारात असाल तर, पाहा काय आहेत नवे दर?
11
Delhi Blast : व्हाईट कॉलर टेरर मॉड्यूल! दिल्ली स्फोट प्रकरणात आणखी एका डॉक्टरला घेतलं ताब्यात
12
PAK vs SL: पाकिस्तानात स्फोट, श्रीलंकन क्रिकेटर मायदेशी परतण्याची भीती, PCBचा मोठा निर्णय
13
Delhi Blast: दिल्ली बॉम्बस्फोटातील कारची ११ वर्षात ५ वेळा विक्री; खरा मालक कोण, शेवटचा व्यवहार कधी झाला?
14
नगरपरिषद निवडणुकीत नवी समीकरणे; बहुजन विकास आघाडी अन् मनसेची युती होणार? नेते म्हणाले...
15
Children's Day 2025: सुकन्या समृद्धी ते म्युच्युअल फंड SIP पर्यंत; बालदिनी तुमच्या मुलांना द्या खास आर्थिक गिफ्ट, जाणून घ्या स्कीम्स
16
बॉलिवूडच्या 'भट' कुटुंबात कटुता!, आलियाने सख्ख्या काकाला बोलवलं नाही लग्नाला अन् राहालाही नाही भेटवलं, मुकेश भट यांचा खुलासा
17
अंजली दमानियांकडून राजीनाम्याची मागणी; मला योग्य वाटेल ते मी करेन, अजित पवारांची प्रतिक्रिया
18
'अमेरिकन कामगारांना ट्रेन करा आणि घरी जा...' ट्रम्प प्रशासनाचं नवीन फर्मान; भारतीय IT अभियंते चिंतेत
19
"हिंदीतील लॉबीने मला स्वीकारलं नाही...", अजिंक्य देव स्पष्टच बोलले; अजय-सनीचं घेतलं नाव
20
डरानेवालो को डराओ! 'शिवतीर्थ'समोर बॅनरबाजी; उत्तर भारतीय सेनेने मनसे प्रमुख राज ठाकरेंना डिवचलं

१५ टक्के बालक मजुरीवर आश्रित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2018 21:54 IST

मागील अनेक वर्षांपासून शासनातर्फे शंभर टक्के पटनोंदणीची मोहीम राबविण्यात येत असून यात बऱ्याच प्रमाणात शासनाला यश आले आहे. तरी प्राथमिक शिक्षण पूर्ण होण्यापूर्वीच १० ते १५ टक्के विद्यार्थी असे असतात की ते एक तर शाळा सोडतात किंवा शाळेत नियमित हजर राहत नाही.

ठळक मुद्देग्रामीण भागातील विदारक सत्य : शाळेपेक्षा कामाला महत्त्व

विजय मानकर ।लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : मागील अनेक वर्षांपासून शासनातर्फे शंभर टक्के पटनोंदणीची मोहीम राबविण्यात येत असून यात बऱ्याच प्रमाणात शासनाला यश आले आहे. तरी प्राथमिक शिक्षण पूर्ण होण्यापूर्वीच १० ते १५ टक्के विद्यार्थी असे असतात की ते एक तर शाळा सोडतात किंवा शाळेत नियमित हजर राहत नाही. याबद्दल तालुक्यातील विविध भागात संपर्क करीत माहिती घेताना असे दिसले की तालुक्यातील ग्रामीण भागासह मुख्यालयाच्या परिसरातील सुमारे १५ टक्के विद्यार्थी किंवा बालक असे असतात की आजही त्यांच्यावर दारिद्र्य कोट्याचा मार बसत असतो. एकंदरित परिस्थिती अशी निर्माण होते की, त्यांना आपल्या गरजा भागविण्यासाठी तसेच आई-वडीलांना आर्थिक हातभार लावण्यासाठी अर्थार्जन करण्याच्या मार्गावर पाऊल टाकावे लागते. परिणामी बाल मजुरीशिवाय दुसरा विकल्प त्यांच्याकडे उरत नाही.शहरी क्षेत्रात सामान्यत: हॉटेल, जनरल स्टोर्स, चहाटपरी, आॅटो रिपेरिंग सेंटर, इमारत बांधकाम इत्यादी ठिकाणी बाल कामगार बघावयास मिळू शकतात. तसेच कायद्याच्या सक्तीमुळे शहरी भागात काही ठिकाणी बाल कामगारांची संख्या घटली तरी ग्रामीण भागात वेगवेगळ्या स्वरुपात बाल कामगार आपल्याला दिसून येतात. ग्रामीण भागात आजही सायकल दुरुस्ती, जनरल स्टोर्स, वीटभट्टी, खड्डे खोदकाम, हॉटेल, घर बांधकाम, हमाल काम इत्यादी क्षेत्रात नेहमी कमी वयाचे बालक परिश्रम करताना दिसून येतात. या शिवाय काही कामे हंगामी स्वरुपाची असून एवढ्या रकमेत इतके काम करुन द्यायचे असे सुद्धा बाल कामागार बघावयास मिळतात.शेतीच्या कामातसगळेच उपयोगीग्रामीण भागात सर्वात जास्त परिश्रम करण्याचे क्षेत्र म्हणजे शेती असून या कामात बालमजुरी विरोधक कायदा कधीच उपयोगी पडू शकत नाही. कारण की शेतीच्या कामात अंड्यातल्या पिल्यापासून काठी टेकून चालणारे वृद्धही आपापली भूमिका बजावत हातभार लावतात. आईच्या गर्भात राहिल्यापासून बालक शेतीच्या कामावर जात असतो. अर्थात गर्भस्त स्त्री आपल्या शेवटच्या दिवसापर्यंत शेतकरी पती सोबत कामावर जाते. बाळ जन्माला आल्यापासून १५ वर्षाच्या वयापर्यंत शेतीच्या कामात त्याची घरी आणि शेतात कामाची भूमिका असते.शेतातील रोवणी व कापणी सारख्या महत्वाच्या कामाच्या वेळी घरातील मोठे व कमवते लोक दिवसभर शेतात राबत असताना लहान मुले-मुली घरकाम ते शेतीकाम करण्यात सतत उपयोगी पडतात.बाल मजुरी करणारी मुले कोणती?ग्रामीण भागासह शहरी भागाचा विचार करता माहिती गोळा करताना असे दिसून आले की, बाल मजुरी करण्यास बाध्य होणारी बालके ही जास्त करुन वडील हयात नसलेले, आइ-वडील दोन्ही नसलेले, सावत्री आई असलेले, दिवसभर मजुरी करणारे आई-वडील असलेले, निरक्षर आई-वडीलांची मुले, स्थलांतरीत कुटुंबातील मुले, मादक पदार्थांच्या नेशत अडकणारी मुले, आई-वडील कमाविण्यासाठी शहरात गेले आणि मुलांना घरी एकटे सोडून गेल्यावर त्याच बरोबर मुलांकडे लक्ष न घालणारे, नशेच्या धुंदीत राहणारे वडील किंवा कुटुंबातील इतर व्यक्तींपासून त्रस्त बालक मजुरी करुन आपल्या गरजा भागविण्यासाठी किंवा मादक पदार्थाचे सेवन करण्यासाठी धडपड करीत असतात. परंतु शिक्षण घेणारे विद्यार्थी व बालके असेही असतात की ते आई-वडीलांची आर्थिक परिस्थिती लक्षात घेवून काम आणि शिक्षण यासाठी वेळेचे नियोजन करुन स्वखर्चाने शिक्षण पूर्ण करण्यासाठी मजुरी करतात. एवढेच नाही तर आई-वडिलांना सुद्धा त्यातून थोडेफार पैशांचे सहकार्य करतात. मजुरी करीत आपल्या गरजा पूर्ण करणाºया बालकांची संख्या भविष्यात कमी होण्यात किती काळ लागेल याचा भविष्यातच पत्ता लागेल.