निवडणुकीसाठी १५ निमलष्करी कंपन्या
By Admin | Updated: September 21, 2014 23:52 IST2014-09-21T23:52:19+5:302014-09-21T23:52:19+5:30
जिल्ह्यातील अर्जुनी/मोरगाव, तिरोडा व आमगाव या चार विधानसभातील मतदारांसाठी १२३० मतदान केंद्र आहेत. मात्र यापैकी २० केंद्र संवेदनशील असून त्याठिकाणी बोगस मतदान व मतदारांना दमदाटी देण्याचा

निवडणुकीसाठी १५ निमलष्करी कंपन्या
४१ केंद्र संवेदनशील : २४ पथके निगरानी करणार
नरेश रहिले - गोंदिया
जिल्ह्यातील अर्जुनी/मोरगाव, तिरोडा व आमगाव या चार विधानसभातील मतदारांसाठी १२३० मतदान केंद्र आहेत. मात्र यापैकी २० केंद्र संवेदनशील असून त्याठिकाणी बोगस मतदान व मतदारांना दमदाटी देण्याचा प्रकार घडू शकतो. तसेच नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशील उपद्रवी केंद्र म्हणून २१ केंद्र जिल्ह्यात गणले जातात. जिल्ह्यातील निवडणुक प्रक्रिया शांततेत व्हावी यासाठी पोलीस विभागाने १५ निमलष्करी कंपन्याची मागणी केली आहे.
जिल्ह्यात उपलब्ध असलेल्या पोलीस दलाच्या व्यतिरीक्त केंद्रीय निमलष्करी दलास पाचारण करण्यात आले आहे. निवडणुकीदरम्यान होणाऱ्या गैरकृत्यावर पोलीस दलाची करडी नजर राहणार आहे. जिल्ह्यात चार विधानसभा मतदार संघ आहे. त्या प्रत्येक मतदार संघात तीन भरारी पथक व तीन निगरानी पथक ठेवण्यात येणार आहे. जिल्ह्यात एकूण १२ भरारी पथके तर १२ निगरानी पथके काम करणार आहेत.
लोक प्रतिनिधी अधिनियम १९५१, भारतीय दंडविधान संहिता व माहिती तंत्रज्ञान अधिनियमांतर्गत निवडणुकीच्या अनुसंगाने निवडणूक विषयी पत्रके, पोस्टर, मुद्रकांचे नाव पत्याशिवाय छापणे किंवा प्रकाशित करणाऱ्याला सहा महिन्याचा कारावास किंवा दोन हजार रुपये दंडाची शिक्षा होऊ शकते. मतदारांना लाच देणे, मतदारांना गैरवाजवी दडपण आणणे, धाक धपटशहा, तोतयागिरी करणे, मतदान केंद्रापासून १०० मिटरच्या आत प्रचार करणाऱ्याला २५० रुपये पर्यंत दंड करता येते. मतदान संपण्याचा निर्धारीत वेळेपूर्वी ४८ तासाच्या अवधीत कोणतीही जाहिर सभा भरविणे, बोलाविणे किंवा हजर राहणे याला २५० रुपयापर्यंत दंड होऊ शकते. मतदान केंद्रात किंवा मतदान केंद्राजवळ गैरवर्तणुक करणाऱ्याला तीन महिन्याचा कारावास होतो. मतदानाच्या बाबतीत विविध वर्ग, धर्म, जाती, जमाती वंशभेद इत्यादीवरून शत्रुत्वाची भावना वाढविणाऱ्या तीन वर्षापर्यंत कारावास, दंड किंवा दोन्ही ही होण्याची तरतूद आहे. मतदानाच्या दिवशी मतदान केंद्राजवळ हत्यार घेऊन जाणाऱ्याला दोन वर्षाचा कारावास, दंड किंवा दोन्हीही शिक्षा होऊ शकतात. मतदानाच्या दिवशी उत्साहवर्धक पेय, मादक, गुंगी आणणारे पेयक, मतदान संपण्याचा ४८ तासाअगोदर पासून मतदानाच्या दिवशी हे पेय विक्री करणाऱ्याला सहा महिन्याची शिक्षा दोन हजार रुपये दंड किंवा दोन्ही होऊ शकतो. उमेदवाराने किंवा त्यांच्या प्रतिनिधीने अनाधिकृतपणे मतदाराची ने-आण करण्याकरिता वाहन वापरल्यास, कोणत्याही उमेदवाराच्या सभेत गैरवर्तणूक करणे, मतदान केंद्र बळजबरीने ताब्यात घेणे याला कमीत-कमी एक ते तीन वर्षाचा कारावास किंवा दंड होऊ शकतो. मतदान करण्यापासून मतदाराला रोकणाऱ्यास तीन वर्षाचा कारावास किंवा दंड होऊ शकतो. विनापरवाना फिरत्या वाहनावर लाऊडस्पीकर लाऊन प्रचार करणाऱ्या आचारसंहितेचा भंग केल्याचा कारणावरून गुन्हा दाखल करता येते.