१५ शाळाबाह्य बालकांना शाळेत केले दाखल ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:31 IST2021-02-11T04:31:25+5:302021-02-11T04:31:25+5:30

मंगळवारी पहिल्याच दिवशी गट साधन केंद्र गोरेगाव येथील विषय साधन व्यक्ती (बालरक्षक)सुनील ठाकूर, सतीश बावनकर व भाष्कर बाहेकार यांनी ...

15 out-of-school children admitted to school () | १५ शाळाबाह्य बालकांना शाळेत केले दाखल ()

१५ शाळाबाह्य बालकांना शाळेत केले दाखल ()

मंगळवारी पहिल्याच दिवशी गट साधन केंद्र गोरेगाव येथील विषय साधन व्यक्ती (बालरक्षक)सुनील ठाकूर, सतीश बावनकर व भाष्कर बाहेकार यांनी गोरेगाव बस स्थानकाच्या मागे वाशिम जिल्ह्यातून आलेले खारक, बदाम खरेदी विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या कुटुंबातील १५ शाळा बाह्य बालकांचा शोध घेऊन शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. या विद्यार्थ्यांना जवळच्या जिल्हा परिषद हायस्कूल,गोरेगाव येथे दाखल करण्याची व्यवस्था करण्यासाठी मुख्याध्यापक एम.पी.शेख यांना अवगत करून देण्यात आले. कुटुंबातील महेक अनिल धुर्वे ही विद्यार्थिनी मागील सत्रात जि.प.हायस्कूल गोरेगाव येथे दाखल केले होते. लॉकडाऊन कालावधीत स्थलांतरित झाल्यानंतर पुन्हा महेक शाळेत दाखल होणार असल्याने गट साधन केंद्र कर्मचारी व मुख्याध्यापक यांनी आनंद व्यक्त केला. ही सर्व बालके वाशिम जिल्ह्यातील काजळेश्वर, कारंजा लाड येथील असून ज्ञानप्रकाश विद्यालय कारंजा लाड येथे शिक्षण घेत असल्याचे सांगण्यात आले. या कुटुंबातील नेहा राम कोडापे ही विद्यार्थिनी असल्याचे सांगितले.

Web Title: 15 out-of-school children admitted to school ()