रुग्णालयांना उपलब्ध करून दिल्या १५ मिनी व्हेेंटिलेटर मशीन ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:30 IST2021-04-22T04:30:52+5:302021-04-22T04:30:52+5:30
गोंदिया : कोरोना बाधित रुग्णांवर वेळीच उपचार व्हावा त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री यांनी गोंदिया ...

रुग्णालयांना उपलब्ध करून दिल्या १५ मिनी व्हेेंटिलेटर मशीन ()
गोंदिया : कोरोना बाधित रुग्णांवर वेळीच उपचार व्हावा त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री यांनी गोंदिया जिल्ह्यासाठी १५ मिनी व्हेंटिलेटर मशीन उपलब्ध करून दिल्या. या मशीनचे गोंदिया कोविड रुग्णांना सेवा देणाऱ्या चार रुग्णालयांना वाटप करण्यात आले.
जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहेत. तर गोंदिया तालुका कोरोनाचा हॉटस्पाॅट होत आहे. अशात रेमडेसिविर, ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण होत आहे. त्यामुळे रुग्णांची गैरसोय होत आहे. हीच बाब लक्षात घेत माजी आ. गोपालदास अग्रवाल यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह चर्चा केली होती. व्हेंटिलेटर मशीन, ऑक्सिजनचा पुरवठा आणि रुग्णालयातील बेड्सची संख्या वाढविण्यासंदर्भात चर्चा केली. यानंतर केंद्रीय मंत्री गडकरी यांनी पहिल्या टप्प्यात १५ बाईपैप (मिनी व्हेटिंलेटर मशीन) उपलब्ध करून दिले. या मशीनचे बुधवारी (दि.२१) गोंदिया येथे वाटप करण्यात आले. गोंदिया येथे सेवा देत असलेले डॉ. माहुले यांच्या रुग्णालयाला दोन मशीन, श्री अग्रसेन स्मारक समितीच्या कोरोना सेंटर ४, डॉ. बजाज यांच्या सेंट्रल हॉस्पिटलला ४ आणि डॉ. बहेकार यांच्या हॉस्पिटलला ४ व्हेंटिलेटर मशीन नि:शुल्क देण्यात आल्या. यावेळी खा. सुनील मेंढे, माजी आ. गाेपालदास अग्रवाल, आ. विजय रहांगडाले, गंजेद्र फुंडे, प्रफुल्ल अग्रवाल, अग्रसेन स्मारक समितीचे अध्यक्ष रामजी अग्रवाल, सी.ए.राजेश व्यास, दामोदर अग्रवाल, डॉ. माहुले, डॉ. रंगलानी, डॉ. दीपक बहेकार आदी उपस्थित होते. मिनी व्हेंटिलेटर उपलब्ध करुन दिल्याबद्दल या सर्वांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, खा. सुनील मेंढे व माजी आ. गोपालदास अग्रवाल यांचे आभार मानले. या वेळी माजी आ. गोपालदास अग्रवाल यांनी रुग्णालयांमध्ये आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी सदैव कटिबध्द असल्याचे सांगितले.