१५ जोडपी विवाहबद्ध

By Admin | Updated: May 1, 2017 00:54 IST2017-05-01T00:54:32+5:302017-05-01T00:54:32+5:30

गोंदिया येथे क्षत्रिय मरठा कलार समाज सामूहिक विवाह सोहळा अक्षय तृतियेच्या पर्वावर पार पडला.

15 Couples Married | १५ जोडपी विवाहबद्ध

१५ जोडपी विवाहबद्ध

सामूहिक विवाह : क्षत्रिय मराठा कलार समाज
परसवाडा : गोंदिया येथे क्षत्रिय मरठा कलार समाज सामूहिक विवाह सोहळा अक्षय तृतियेच्या पर्वावर पार पडला. यात गोंदिया, बालाघाट, भंडारा, नागपूर, रामपूर, बोदल, भोपाल जिल्ह्यातील मंडळी वर-वधू घेऊन समाज भवनामध्ये पोहचली होती. यात १५ जोडप्यांचे शुभमंगल करण्यात आले.
अध्यक्षस्थानी मनीष चौरागडे होते. अतिथी म्हणून दामोदर दियावार, राकेश सेवईवार, महेंद्र डोहरे, पालक सेवईवार, डुमेश चौरागडे, माधो भोयर, सुरेश चौरागडे, नारायण प्रसाद, जमईवार, भागवत, धपाडे, मदन पालेवार, डॉ. अनिल चौरागडे, डॉ. राजे कावळे, तपन कावळे, सुरेश पिपलेवार, धरमलाल धुवारे, नंदकिशोर भोयर, अनूप सेवईवार, रामनारायण भोयर उपस्थित होते.
महेंद्र डोहळे नागपूर यांनी समाज भवन, महिलांकरिता स्वतंत्र खोलीसाठी ५० हजार रूपये आपल्या वडिलांच्या स्मृतीत दिले, त्याचे भूमिपूजन करण्यात आले. अनेक कलार समाजबांधवानी आर्थिक सहकार्य केले. वधूंना जीवनावश्यक वस्तू, भांडी, ताट, पाणी फिल्टर आदी वस्तू भेट देण्यात आल्या.
संचालन शरद डोहरे यांनी केले. आभार निलकंठ सिरसाटे यांनी मानले. कार्यक्रमासाठी नवयुवक संघ, महिला संगठन समिती, शोभा धुवारे, सिंधू पिपरेवार, जयश्री सिरसाटे, आरती धपाडे, कांती बिजेवार, सुनिता डोहरे, मीना चौरागडे, चेतना डोहरे, सुनिता सोनवाने, अर्चना बारेवार, रिता बिडोवार, वंदना चौरागडे, नितू धुवारे, वर्षा चौरागडे व सर्व महिलांनी सहकार्य केले.(वार्ताहर)

Web Title: 15 Couples Married

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.