गायत्री हॉस्पिटलची तोडफोड करणाऱ्या १५ जणांवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:30 IST2021-04-22T04:30:54+5:302021-04-22T04:30:54+5:30
यासंदर्भात साईबाबा मेडिकल येथील कर्मचारी राजेश रूपलाल बघेले (३०) रा. विमलताई स्कूलसमोर भगतसिंग वाॅर्ड विजयनगर गोंदिया यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ...

गायत्री हॉस्पिटलची तोडफोड करणाऱ्या १५ जणांवर गुन्हा दाखल
यासंदर्भात साईबाबा मेडिकल येथील कर्मचारी राजेश रूपलाल बघेले (३०) रा. विमलताई स्कूलसमोर भगतसिंग वाॅर्ड विजयनगर गोंदिया यांनी दिलेल्या तक्रारीनुसार २० एप्रिलच्या रात्री १० वाजताच्या सुमारास दोन जण हॉस्पिटलमध्ये आले. आमच्या ओळखीचे दोन इसम कोविड केअर वाॅर्डात आहेत, त्यांना मला भेटायचे असे सांगितल्यावर त्यांना भेटण्यास मनाई करण्यात आली. त्यावरून त्यांनी रागाने बोलून दार बंद करीत इथून निघून गेले. थोड्या वेळाने दहा ते पंधरा लोकांना सोबत घेऊन आले आणि त्यांना आणि डॉक्टरांना शिवीगाळ करून हॉस्पिटलच्या प्रवेशद्वारावर ठेवलेला टेबल जोरात फेकला. हॉस्पिटलची केबिन तोडून डॉक्टरांच्या नावाची असलेली पाटी फेकून दिली. याची माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक अभिजित भुजबळ व त्यांचा कर्मचाऱ्यांनी हॉस्पिटल गाठले. परंतु पोलीस येण्यापूर्वी आरोपी पळून गेले होते. या घटनेसंदर्भात गोंदिया शहर पोलिसांनी आरोपींविरुद्ध भांदवि कलम १४३, १४७, १४९,१८८, २६९, ५०४, ५०६, २९४,४२७,४५१ महाराष्ट्र वैद्यकीय सेवा वैयक्तिक आणि वैद्यकीय सेवा संस्था हिंसक कृत्य व मालमत्तेची हानी अधिनियम २०१० चे कलम चार महाराष्ट्र पोलीस अधिनियम चे कलम ३७ (१), ३७ (३), १३५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.