१५ खात्यातील पैसे १३ खात्यात वळविले
By Admin | Updated: May 29, 2014 02:32 IST2014-05-29T02:32:20+5:302014-05-29T02:32:20+5:30
सौंदडच्या बँक ऑफ महाराष्ट्र शाखेतील व्यवस्थापकाने १५ ग्राहकांच्या खात्यातील ९ लाख रुपये १३ खात्यांमध्ये वळते करून स्वत:साठी काढले.

१५ खात्यातील पैसे १३ खात्यात वळविले
गोंदिया : सौंदडच्या बँक ऑफ महाराष्ट्र शाखेतील व्यवस्थापकाने १५ ग्राहकांच्या खात्यातील ९ लाख रुपये १३ खात्यांमध्ये वळते करून स्वत:साठी काढले. त्या व्यवस्थापकावर डुग्गीपार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान सदर व्यवस्थआपक लक्ष्मण धकाते याला बँकेने निलंबित केले असून तो सध्या फरार आहे. नागपूरच्या ईश्वरनगर प्लॉट नं. २१ येथील रहिवासी असलेला आरोपी लक्ष्मण कृष्णराव धकाते (५४) याने डिसेंबर २0११ ते जानेवारी २0१४ या काळात सौंदड येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेत असलेल्या ग्राहकांच्या १५ खात्यातील रक्कम १३ खात्यात वळविले. त्यानंतर त्या १३ खात्यांमधील ९ लाख ९ हजार ६४६ रुपये काढून घेतले. या प्रकरणात व्यवस्थापकावर झोनल व्यवस्थापकाच्या तक्रारीवरून फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र डुप्पीपार पोलिसांनी अजून हे प्रकरण गांभिर्याने घेतलेले नाही. याबाबत ठाणेदार केंद्र यांच्याशी संपर्क केला असता या प्रकरणाचा तपास सहायक फौजदार मेश्राम यांच्याकडून काढून पोलीस उपनिरीक्षकाकडे देणार असून गरज पडल्यास आर्थिक गुन्हे शाखेची मदत घेतली जाईल. याबाबत पोलीस अधीक्षकांशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याचे ते म्हणाले.